अकोला: अकोला (Akola) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पत्रकाराचा (Journalist) मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या अशा वागण्याचा अकोल्यातील सर्वच पक्षांनी निषेध केला आहे. एखाद्या मंत्र्याकडून पत्रकारांशी अशाप्रकारे वागणूक मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
यशोमती ठाकूर यांनी आज विविध विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषद दुपारी साडेबारा वाजता घेणार असल्याचा मेसेज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून आला होता. त्यामुळे नियोजित वेळेच्या आधीच पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पोहोचले होते.
मात्र एक तास होऊन देखील मंत्री यशोमती ठाकूर पत्रकार परिषदेसाठी आल्या नाही. शेवटी वाट पाहून पत्रकार निघून जात आहेत असा जेव्हा मंत्री ठाकूर यांना मेसेज देण्यात आला त्यानंतर त्या तात्काळ बाहेर आल्या.
पत्रकार परिषदेला उशिर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत असताना या सर्व प्रकाराचे व्हीडिओ टीव्ही 9 चे पत्रकार गणेश सोनोने हे काढत असताना त्यांनी लगेच त्यांच्या जवळील मोबाइल हिसकावून घेतला. तसेच त्या मोबाइल मधील व्हीडिओ पण डिलीट केले. यशोमती ठाकूर यांच्या या वागण्यामुळे पत्रकार आणि मंत्री ठाकूर यांच्यात वाद सुरू झाला. त्यामध्ये काँग्रेसचे इतर पदाधिकारी यांनी देखील पत्रकारांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
पत्रकारांची अशा प्रकारे राज्यातील सत्ताधारी मंत्री हे मुस्कटदाबी करीत असल्याने या घटनेचा श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. तसेच पत्रकार परिषदेवर त्यांनी बहिष्कार देखील घातला आहे.
‘ब्रेक द चेन’ ला सरकारमधून विरोध, अमरावतीत निर्बंध शिथिल करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे आता यशोमती ठाकूर नेमकी आपली बाजू कशी मांडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच आता याप्रकरणी विरोधकही यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. (minister yashomati thakur argues with journalists in akola)
ADVERTISEMENT