राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू झालीये. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिव संवाद यात्रेत मध्यावधी निवडणुकीबद्दल विधान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनीही ही शक्यता व्यक्त केलीये. विशेषतः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यात निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, असं मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केलीये. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, असा दावाच अमोर मिटकरी यांनी केला आहे.
शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार? राज ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘अजित पवार मुख्यमंत्री होणार?’; अमोल मिटकरी काय म्हणाले?
बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला शनिवारी अमोल मिटकरी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार मिटकरींनी माध्यमांशी संवाद साधला. ”मध्यावधी निवडणूक लागली, तर राष्ट्रवादी घवघवीत यश मिळवेल. कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असते, पण मध्यवर्ती निवडणूक लागली तर पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
रोहित पवारांनी व्यक्त केली मध्यावधी निवडणुकीची शक्यता
जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मध्यावधी निवडणुकीबद्दल भाष्य केलं. “सध्याची परिस्थिती पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. येत्या ३ महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यानंतर लगेचच आमदारकीची निवडणूक होण्याची शक्यता आहे,” असं भाकीत रोहित पवारांनी केलंय.
2024 नंतरचा काळ हा युवकांचा- रोहित पवार
“2024 नंतरचा काळ हा युवकांचा आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन असेलच, पण निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार. तरुणांच्या हातात सत्तेची गणितं आणि निर्णय हे असेल,” आमदार रोहित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT