विवाहित महिलेशी अश्लील वागणूक; मनसे कार्यकर्त्यांनी मजनूला दिला चोप

मुंबई तक

• 07:47 AM • 10 Oct 2021

विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजूनला मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. अश्लील वर्तणूक करणाऱा व्यक्ती मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसईच्या नायगावमध्ये विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजनूला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. मनोज थोरात असं या […]

Mumbaitak
follow google news

विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजूनला मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. अश्लील वर्तणूक करणाऱा व्यक्ती मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

वसईच्या नायगावमध्ये विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजनूला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. मनोज थोरात असं या मजनूचं नाव असून तो मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात राहणारा आहे.

भयंकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना

मनोज थोरात याने नायगाव येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. महिलेने त्यास नकार दिल्यानंतर तो वेगवेगळ्या पद्धतीने तिला धमकविण्याचा प्रयत्न करीत होता.

ही बाब पीडित महिलेने ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सांगितल्यानंतर नायगावमधील मनसे कार्यकर्ते प्रफुल्ल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मजनूला महिलेचा पाठलाग करताना रंगेहाथ पकडलं.

त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप देऊन त्याला समज दिली. तसेच नंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.

नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार

NCB अधिकाऱ्याला महिलेची छेड काढल्याप्रकरणी अटक

काही दिवसांपूर्वीच एनसीबी अधिकाऱ्यानेच महिलेची छेड काढल्याची घटना समोर आली होती. अधिकारी नवी मुंबईती असून, त्याला अटकही करण्यात आलेली आहे. या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद पोलिसांनी मुंबईतल्या एनसीबी अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव दिनेश चव्हाण असे आहे. तो नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहतो.

    follow whatsapp