गोवा: ‘फक्त मोदी सरकारच लोकांना सुरक्षा, सन्मान देऊ शकतं’, अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई तक

• 03:34 PM • 30 Jan 2022

पणजी: गोव्यातील पोंडा येथे एका निवडणूक कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गोव्याच्या राजकारणात इतके पक्ष का आले आहेत, हे कळत नाही. TMC आणि AAP गोव्याचा विकास करु शकतील का? त्यांना गोव्याबाबत काही […]

Mumbaitak
follow google news

पणजी: गोव्यातील पोंडा येथे एका निवडणूक कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहल्यानंतर अमित शाह म्हणाले की, गोव्याच्या राजकारणात इतके पक्ष का आले आहेत, हे कळत नाही. TMC आणि AAP गोव्याचा विकास करु शकतील का? त्यांना गोव्याबाबत काही समजतं का?

हे वाचलं का?

गृहमंत्री शाह म्हणाले, भाजपच्या राजवटीत अस्थिरता होती आणि लोकांनी आम्हाला 10 वर्षे सत्ता दिली आणि आम्ही विकासाची लाट आणली. आमच्यासाठी गोवा म्हणजे- गोल्डन गोवा आणि काँग्रेससाठी गोव्याचा अर्थ म्हणजे- गांधी कुटुंबीयांचा गोवा… त्यांना सुट्टी घालविण्यासाठी एक पर्यटन स्थळ. कारण त्यांचे नेते खूप सुट्ट्या एन्जॉय करतात.

शाह म्हणाले, ‘दुसरा कोणताही पक्ष गोव्यात सुशासन देऊ शकत नाही. हे पक्ष इथे सरकार बनवू शकत नाहीत, इथे फक्त भाजपच सरकार बनवत आहे. मोदी सरकारचे धोरण असे आहे की, छोट्या राज्यांना अधिक विकास हवा आहे.’

‘गोव्यात अटल सेतू पूल, विमानतळ तेव्हाच बांधता येईल, जेव्हा सीएम सावंत येथून पत्र पाठवतील आणि मोदीजी तातडीने धोरणांना मंजुरी देतील. काँग्रेस विकास करू शकत नाही.’

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले, ‘राहुल गांधी केवळ मोदींवर टीका करतात, भाजपने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत. गोव्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी 500 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.’

विरोधी पक्षांवर टीका करताना शाह म्हणाले की, इथे आलेल्या राजकीय पक्षांना विचारा की ते गोव्यासाठी काय करू शकतील? त्यांना एकही जागा मिळणार नाही म्हणून ते जनतेला मोठ-मोठी स्वप्ने दाखवत आहेत. पण पायाभूत सुविधा, विकास, सुरक्षा, आदिवासी कल्याणासाठी त्यांची धोरणे काय आहेत? या पक्षांच्या जाहीरनाम्यात याबाबत काहीही नाही.

कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री म्हणाले की, ‘भाजप हा जबाबदार पक्ष असून नेहमीच दिलेले वचन पूर्ण करतो. नवे पक्ष फक्त आंदोलनाचे राजकारण करतील आणि केंद्राशी भांडण्यात आपला वेळ घालवतील. त्यामुळे सर्व विकासकामे ठप्प होतील. गोव्यात एकही घर असे नाही ज्यात वीज नाही, मी तुम्हाला विचारायला आलो आहे- इथे भाजपचे सरकार स्थापन झाले तर मोदी सरकार मजबूत होईल की नाही?’

अमित शाह पुढे म्हणाले की, ‘देशाचे रक्षण आणि जनतेला सन्मान देण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळेच गोव्याची ही निवडणूक मोदी सरकारला बळ देणारी आहे.’

दरम्यान, गोव्यातील आपली सत्ता टिकविण्यासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र, आता गोव्यातील जनता भाजपला पुन्हा सत्ता देणार की नाही हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp