मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी सिल्वासाच्या जिल्हाधिकाऱ्यांची हायकोर्टात याचिका

मुंबई तक

• 12:03 PM • 24 Mar 2021

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी सिल्वासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅडव्होकेट अमित देसाई या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. संदीप कुमार सिंग यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे ती रद्द करण्याचीही मागणी केली आहे. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव? परमबीर यांच्या पत्रात महत्वाची माहिती […]

Mumbaitak
follow google news

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी सिल्वासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅडव्होकेट अमित देसाई या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. संदीप कुमार सिंग यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे ती रद्द करण्याचीही मागणी केली आहे.

हे वाचलं का?

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव? परमबीर यांच्या पत्रात महत्वाची माहिती

अमित देसाई यांनी आज कोर्टाला सांगितलं की मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण हे राजकीय हेतूने प्रेरित होतं. परमबीर सिंग यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राचा संदर्भही यामध्ये त्यांनी दिला. मोहन डेलकर यांना सिल्वासा मुक्ती दिवसाच्या दिवशी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण करू दिलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप एफआय़आरमध्ये लावण्यात आला होता असंही स्पष्ट करण्यात आलं आहे आणि ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेवर आता गुरूवारी सुनावणी होणार आहे. एस. एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठाने हेदेखील सांगितलं आहे की तूर्तास जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

काय आहे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण?

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह २२ फेब्रुवारीला मुंबईतल्या हॉटेलमध्ये आढळला. त्यांनी आत्महत्या केली असून त्यांची सुसाईड नोटही आढळून आली. मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिली. मोहन डेलकर सातवेळा खासदार राहिले आहेत. ५८ वर्षीय मोहन डेलकर दादरा नगर हवेलीचे खासदार होते. १९८९ मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. सलग सहावेळा त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. २०१९ ला ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

    follow whatsapp