केंद्र आणि राज्यांतील सरकारच्या कामाबद्दल नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी इंडिया टुडेच्या वतीने एक पाहणी करण्यात आली. यात कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली होती याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यात सात मुख्यमंत्र्यांना लोकांची पसंती दिली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ हे देशभरातील मुख्यमंत्र्यामध्ये ‘बेस्ट सीएम’ ठरले आहेत. (Yogi adityanath best CM)
ADVERTISEMENT
इंडिया टुडेनं विविध प्रश्नांसंदर्भात नागरिकांची कौल जाणून घेण्यासाठी एक पाहणी केली. या पाहणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारचे निर्णय यासह देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? आदीबद्दल लोकांची मतं जाणून घेतली.
यात विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कामाबद्दलही चर्चा होतेय. यासंदर्भाने इंडिया टुडेनं देशातील कोणते मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं याविषयी पाहणी केली. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बेस्ट सीएम ठरले आहेत. जुलै २०२१ मध्ये ही पाहणी करण्यात आली.
देशभरातील विविध राज्यांच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या कामाला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. योगी आदित्यानाथ यांना सर्वाधिक १९ टक्के मतं मिळाली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. केजरीवाल यांना १४ टक्के लोकांनी बेस्ट सीएम म्हणून पसंती दिली आहे.
उद्धव ठाकरे कितव्या स्थानी?
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसरं स्थान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिळालं आहे. ममतांना ११ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. चंद्रशेखर रेड्डी (६ टक्के लोकांची पसंती), पाचव्या स्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (५ टक्के मतं), तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहाव्या स्थानी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे किती लोकप्रिय?
संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांची त्यांच्या त्यांच्या राज्यात किती लोकप्रियता आहे. याबद्दलही पाहणी करण्यात आली. यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी अव्वल क्रमांक (४२ टक्के लोकांची पसंती) मिळवला आहे. तर त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे दुसऱ्या क्रमांकावर (३८ टक्के लोकांची पसंती) आहे. तर तिसऱ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा क्रमांक (३५ टक्के नागरिकांची पसंती) आहे. तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक (३१ टक्के लोकांची पसंती) आहे. तर पाचव्या क्रमांकावर ममता बॅनर्जी (३० टक्के लोकांची पसंती) असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सहाव्या क्रमांकावर (२९ टक्के लोकांची पसंती) आहेत.
ADVERTISEMENT