Mood Of The Nation : कोणता नेता तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करू शकतो? जनतेचं उत्तर काय?

मुंबई तक

• 05:04 PM • 17 Aug 2021

लोकसभा निवडणुका तीन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत, अशात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या घरी झालेली बैठक, शरद पवारांनी घेतलेली प्रशांत किशोर यांची भेट. काँग्रेसला आणि शिवसेनेला सोबत घेण्याचं केलेलं वक्तव्य या सगळ्यामुळे विरोधकांची एक तिसरी आघाडी तयार होणार का? हा प्रश्न चर्चिला जातो आहे. याबाबत इंडिया टुडेने 19 राज्यांमधील लोकांची मतं जाणून […]

Mumbaitak
follow google news

लोकसभा निवडणुका तीन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत, अशात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या घरी झालेली बैठक, शरद पवारांनी घेतलेली प्रशांत किशोर यांची भेट. काँग्रेसला आणि शिवसेनेला सोबत घेण्याचं केलेलं वक्तव्य या सगळ्यामुळे विरोधकांची एक तिसरी आघाडी तयार होणार का? हा प्रश्न चर्चिला जातो आहे.

हे वाचलं का?

याबाबत इंडिया टुडेने 19 राज्यांमधील लोकांची मतं जाणून घेतली. या लोकांनी तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व जर ती बिगर काँग्रेसशिवाय झाली तर कुणाला पसंती दिली आहे? इंडिया टुडेने मूड ऑफ द नेशनमध्ये जाणून घेतलं आहे. आपण जाणून घेऊया कुणाला पहिली पसंती लोकांनी दिली आहे.

तिसरा आघाडीचा नेता म्हणून लोकांनी पहिली पसंती दिली आहे ती अरविंद केजरीवाल यांना. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे लोक काँग्रेस आणि भाजपचा पर्याय म्हणून बघत आहेत. 20 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाला तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व म्हणून पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल हे लोकपाल चळवळीतून तयार झालेले आणि देशाला मिळालेले नेते आहेत. ते माजी सनदी अधिकारी आहेत त्यांनी लोकपाल आंदोलनासाठी उभी केलेली चळवळ संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय होऊन आम आदमी पार्टी म्हणजेच आप हा पक्ष स्थापन केला. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ते सलग दोनदा निवडून आले. इंडिया टुडेच्या सर्व्हेत लोकांनी तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व म्हणून पहिली पसंती अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे.

त्यानंतरचं नाव आहे ते ममता बॅनर्जी यांचं. काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि ममता असा थेट सामना होता. ममता बॅनर्जी यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि पश्चिम बंगाल जिंकूनही दाखवलं त्यामुळे त्यांचा करीश्मा आता कायम आहे. इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये बिगर काँग्रेसशिवाय तिसरी आघाडीचं नेतृत्व म्हणून दुसरा पर्याय निवडला आहे तो ममता बॅनर्जी यांचा.

ममता बॅनर्जीमार्फत 8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे ती नितीश कुमार यांच्या नावाला. त्यापाठोपाठ आहेत अखिलेश यादव आणि शरद पवार. अखिलेश यादव यांना बिगर काँग्रेसच्या तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून 8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर शरद पवार यांना 7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मायावती यांना 5 टक्के लोकांनी तिसऱ्या आघाडीच्या नेत्या म्हणून पसंती दर्शवली आहे. तर नवीन पटनायक यांना 5 टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 टक्के, जगनमोहन रेड्डींना 5 टक्के तर तेजस्वी यादव यांना 3 टक्के लोकांनी तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून पसंती दर्शवली आहे.

    follow whatsapp