NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर; कोरोना काळात शेतकऱ्यांपेक्षा जास्त व्यावसायिकांनी केल्या आत्महत्या

मुंबई तक

• 12:28 PM • 31 Aug 2022

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रांवर आणि लोकांवर परिणाम झाला. तरी, देशातील व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला .त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आत्महत्या केली. हे आम्ही म्हणत नाही, तर इकॉनॉमिक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ची आकडेवारी सांगत आहे. त्यांच्या मते, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींनी जास्त […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रांवर आणि लोकांवर परिणाम झाला. तरी, देशातील व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला .त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आत्महत्या केली. हे आम्ही म्हणत नाही, तर इकॉनॉमिक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ची आकडेवारी सांगत आहे. त्यांच्या मते, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींनी जास्त आत्महत्या केल्या आहेत.

हे वाचलं का?

12,055 व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या

इकॉनॉमिक नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये, एकूण 12,055 व्यावसायिकांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये हा आकडा 11,716 व्यावसायिक होता. 2020 मधील एकूण आत्महत्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यात 7.2 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. उद्योजकांवर केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारीही या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.

10,881 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, कॉर्पोरेट क्षेत्रातील मृत्यूंची संख्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये देशात एकूण 10,881 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. विश्लेषणात समोर आलेल्या बाबीनुसार, 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत 2021 मध्ये स्वयंरोजगार उद्योजकांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कर्नाटक आघाडीवर आहे

व्यावसायिकांच्या आत्महत्यांच्या बाबतीत देशात कर्नाटक राज्य अव्वल आहे. एकूण प्रकरणांपैकी 14.3 टक्के व्यावसायिक कर्नाटकातील आहेत. यानंतर 13.2 टक्क्यांसह महाराष्ट्र दुसऱ्या तर मध्य प्रदेश 11.3 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सर्वाधिक व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. तामिळनाडू 9.4 टक्क्यांसह चौथ्या आणि तेलंगणा 7.5 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

आत्महत्यादरात वाढ

बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, देशातील एकूण आत्महत्येचे प्रमाण 2017 मध्ये प्रति 1 लाख लोकांमागे 9.9 होते ते 2021 मध्ये 12 पर्यंत वाढले आहे. आत्महत्येमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे लोक सर्वात मोठे होते. NCRB कडून असे सांगण्यात आले की 2021 मध्ये एकूण 12,055 व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांपैकी 4,532 विक्रेते, 3633 व्यापारी आणि इतर व्यवसायात गुंतलेल्या 3,890 व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.

आत्महत्या प्रकरणांमागील कारणं

एनसीआरबीच्या आकडेवारीत व्यावसायिकांच्या मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. दिवाळखोरी आणि कर्जाचा वाढता बोजा हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. EY च्या अहवालानुसार, 1,000 लहान आणि सूक्ष्म उद्योजकांवर (MSMEs) केलेल्या सर्वेक्षणातून व्यवसायावर कोरोनाच्या परिणामाचे संपूर्ण चित्र समोर आले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सुमारे 70 टक्के प्रतिसादकर्त्यांनी कोविड-19 महामारीदरम्यान कमी ऑर्डर, व्यापार तूट, कच्च्या मालाची उपलब्धता नसणे अशा विविध समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले.

    follow whatsapp