महाराष्ट्रात दिवसभरात 23 हजार 65 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 52 लाख 41 हजार 833 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 92.76 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 24 हजार 752 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर आज दिवसभरात 453 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.62 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 38 लाख 24 हजार 959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 50 हजार 907 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 70 हजार 326 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 19 हजार 943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 3 लाख 15 हजार 42 सक्रिय रूग्ण आहेत.
भारतात 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय?
आज राज्यात 24,752 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 56,50 ,907 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण 453 मृत्यूंपैकी 323 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 130 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 539 ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
गरजू,गरीब लोकांचं मोफत लसीकरण व्हावं यासाठी लता मंगेशकरांनी सुरू केला ‘श्रीमंगेश व्हँक्सिन फंड’
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई- 28 हजार 74
ठाणे – 21 हजार 949
पुणे – 45 हजार 655
सातारा- 19 हजार 958
सांगली- 14 हजार 906
कोल्हापूर- 16 हजार 962
सोलापूर – 14 हजार 860
नाशिक- 13 हजार 961
अहमदनगर- 13 हजार 82
नागपूर – 15 हजार 201
ADVERTISEMENT