महाराष्ट्रात दिवसभरात २८ हजार ६९९ कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. तर १३२ मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. दिवसभरात १३ हजार १६५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात एकूण २२ लाख ४७ हजार ४९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८८.७३ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.१२ टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
होळी साजरी करु नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आदेश
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाख प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ३३ हजार २६ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७७ हजार २६५ जण होमक्वारंटाईन आहेत तर ११ हजार ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात २८ हजार ६९९ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंतच्या एकूण रूग्णांची संख्या २५ लाख ३३ हजार २६ इतकी झाली आहे.
कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown
आज नोंद झालेल्या १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३५ मृत्यू पुणे ११, ठाणे ११, नाशिक ९, औरंगाबाद २, सातारा १ आणि नंदुरबार १ असे आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई- २६ हजार ५९९
ठाणे – २२ हजार ५१३
पुणे – ४३ हजार ५९०
नाशिक- १५ हजार ७१०
जळगाव- ६ हजार ८७
धुळे- ३ हजार ४५
औरंगाबाद- १५ हजार ३८०
नांदेड – १० हजार १०६
अकोला- ५ हजार ७०४
नागपूर ३३ हजार १६०
अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण पुण्यात आणि त्यानंतर नागपुरात आहेत. पुण्यात ४३ हजारांपेक्षा जास्त तर नागपुरात ३३ हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत.
ADVERTISEMENT