महाराष्ट्रात 5 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 37 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 02:05 PM • 06 Sep 2021

महाराष्ट्रात 5 हजार 988 कोरोना रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातले एकूण 63 लाख 755 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतकं झालं आहे. आज राज्यात 3626 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 37 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात 5 हजार 988 कोरोना रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातले एकूण 63 लाख 755 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतकं झालं आहे. आज राज्यात 3626 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे.

हे वाचलं का?

राज्यात दिवसभरात 37 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 3 लाख 3 हजार 169 होमक्वारंटाईन व्यक्ती आहेत. तर 1963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात आज घडीला 47 हजार 695 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3626 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,89,800 झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्ण

मुंबई- 4273

ठाणे-7275

रत्नागिरी-1081

पुणे-12413

सातारा-6328

सांगली-2342

कोल्हापूर-1090

सोलापूर-2609

अहमदनगर-4975

सर्वाधिक सक्रिय रूग्ण असलेला जिल्हा सध्या पुणे आहे. त्यानंतर ठाणे, सातारा आणि अहमदनगर आणि मुंबईत केसेस आहेत. ही बाब काळजीत भर टाकणारी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय आवाहन केलं आहे?

‘कोरोनाच्या संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून, दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या’, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात रुग्णवाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ‘राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू’, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    follow whatsapp