महाराष्ट्रात दिवसभरात 60 हजार 212 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 281 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 31 हजार 624 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 28 लाख 66 हजार 97 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.44 टक्के झाले आहे. आजपर्यंत 2 कोटी 25 लाख 60 हजार 51 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35 लाख 19 हजार 208 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
ADVERTISEMENT
Break The Chain:राज्यात बुधवार रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांची संचारबंदी
राज्यात आज घडीला 5 लाख 93 हजार 42 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात 60 हजार 212 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 19 हजार 208 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण 281 मृत्यूंपैकी 177 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 55 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 49 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे 49 मृत्यू नांदेड 11, नागपूर 10, औरंगाबाद 6, बुलढाणा 5, ठाणे 4, जालना 3, कोल्हापूर 3, बीड 2, जळगाव 1, नंदूरबार 1, परभणी 1, सोलापूर 1 आणि यवतमाळ 1 असे आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई-86 हजार 98
ठाणे-89 हजार 303
पुणे- 1 लाख 18 हजार 168
अहमदनगर-15 हजार 642
नाशिक-41 हजार 438
जळगाव-11 हजार 342
औरंगाबाद-14 हजार 347
नागपूर-65 हजार 527
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय संख्येचा विचार केला तर पुणे, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात एक लाखांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत. ठाण्यात 89 हजारांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत तर मुंबईत 86 हजारांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत.
ADVERTISEMENT