महाराष्ट्रात दिवसभरात 62 हजार 97 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात 519 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात 54 हजार 224 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजवर एकूण 32 लाख 13 हजार 464 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.14 एवढे झाले आहे. राज्यातला मृत्यू दर 1.55 टक्के एवढा आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पुन्हा Lockdown का लावावा लागतो आहे? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 43 हजार 41 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 39 लाख 60 हजार 359 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38 लाख 76 हजार 998 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत 27 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात दिवसभरात 62 हजार 97 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 39 लाख 60 हजार 359 झाली आहे.
आज नोंद झालेल्या 519 मृत्यूंपैकी 307 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 114 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 98 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. हे 98 मृत्यू नाशिक 23, सोलापूर 20, धुळे 10, औरंगाबाद 9, ठाणे 8, पालघर 7, नांदेड 6, अहमदगर 5, नंदूरबार 3, पुणे 1 आणि रायगड 1 असे आहेत.
मुख्यमंत्री उद्या Lockdown ची घोषणा करणार, दहावीची परीक्षा रद्द-राजेश टोपे
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई -82 हजार 671
ठाणे- 80 हजार 440
पालघर – 13 हजार 573
रायगड- 13 हजार 279
पुणे- 1 लाख 17 हजार 521
सातारा- 14 हजार 183
सोलापूर- 12 हजार 487
नाशिक- 44 हजार 279
अहमदनगर- 21 हजार 634
जळगाव- 13 हजार 425
औरंगाबाद-14 हजार 779
बीड-11 हजार 359
लातूर- 19 हजार 62
परभणी – 12 हजार 964
नांदेड- 13 हजार 233
नागपूर- 78 हजार 484
भंडारा- 15 हजार 186
चंद्रपूर-15 हजार 744
ADVERTISEMENT