महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 196 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 9 हजार 364 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.93 टक्के इतकं झालं आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 132 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 158 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर हा सध्या 2.11 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 14 लाख 89 हजार 80 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 6 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 46 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2371 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज घडीला 58 हजार 69 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 5 हजार 132 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 6 हजार 345 इतकी झाली आहे.
मुंबईत 283 नवे रूग्ण
मुंबईत दिवसभरात 283 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 297 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 18 हजार 955 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर डबलिंग रेट 2057 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात 266 नवे रूग्ण
पुण्यात 266 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 215 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 2 हजार 56 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात पुण्यात पाच मृत्यूंची नोंद झाली आहे.
Mumbai vaccination scam: मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणी बारामतीमधील लॉजमधून आरोपीला अटक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांचं यश आहे. तसंच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. यापुढे आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. फक्त अर्थचक्र सुरळीत रहावे म्हणून काही प्रमाणात निर्बंध शिथील केले आहेत हे विसरता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
मात्र नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी काही जणांची वागणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि कोव्हिड योद्धा होता नाही आलं तरी निदान कोव्हिडदूत बनून तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT