Akola: मुलीला जन्म दिला अन् आईने हॉस्पिटलमध्येच घेतला फास, कारण…

मुंबई तक

17 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Akola Crime news : अकोला : येथून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. अकोला (Akola) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एका नवमातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असं या मृत नवमातेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच गोदावरीने मुलीला जन्म दिला होता. पण मागील 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेरीस आज (शुक्रवारी) […]

Mumbaitak
follow google news

Akola Crime news :

हे वाचलं का?

अकोला : येथून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. अकोला (Akola) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एका नवमातेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असं या मृत नवमातेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच गोदावरीने मुलीला जन्म दिला होता. पण मागील 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेरीस आज (शुक्रवारी) सकाळी वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयात तिचा मृतदेह आढळून आला. (Mother’s suicide at Akola district general hospital)

याबाबत डीन डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या गोदावरी खिल्लारे हिला काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 मार्चला तिने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, जन्मानंतर काही कारणांमुळे मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आईला डिस्चार्ज देऊनही अॅडमिट करुन ठेवलं होतं. मात्र 15 मार्चपासून ती अचानक गायब झाली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी मृत गोदावरी यांच्या सासूने सून हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, सफाई कर्मचांऱ्याचा संप सुरू असल्याने 3 दिवसांपासून शौचालयात कोणीही गेलं नव्हतं. आज साफसफाई करायला गेले असता वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर बघितले असता गोदावरी यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

मुलगी झाल्याने मानसिक छळ?

दरम्यान, मागील 15 दिवसांपासून गोदावरी यांच्या सासर आणि माहेरची मंडळी रुग्णालयातच उपस्थित होते. मात्र आता मुलीच्या जन्मानंतर गोदावरी यांचा सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ झाल्याचा आणि यातूनच आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नेमकं कारण समोर आलं नसलं तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp