2019 च्या MPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असलेला MPSC चा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनाची साथ आली त्यामुळे भरतीचा निकाल लागण्याचा उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्नही होताच त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला. अनेक जणांना पदं मिळाली आणि त्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या.
ADVERTISEMENT
या परीक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
शासनाकडून आलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदं ही खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.
पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं नियुक्ती नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात MPSC चा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता हा निकाल लावण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT