Union Budget 2023 : मुकेश अंबानींनी गौतम अदानींना टाकलं मागे, कसं?

मुंबई तक

• 10:53 AM • 01 Feb 2023

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान, मुकेश अंबानी (mukesh ambani) यांनी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत (Top ten Richest) गौतम अदानींना (Gautam adani) मागे टाकले आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Net worth ) $83.9 अब्ज इतकी खाली आली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी आता 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह […]

Mumbaitak
follow google news

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेदरम्यान, मुकेश अंबानी (mukesh ambani) यांनी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत (Top ten Richest) गौतम अदानींना (Gautam adani) मागे टाकले आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Net worth ) $83.9 अब्ज इतकी खाली आली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी आता 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानींना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या या यादीत अदानी 10 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर अंबानी 9व्या क्रमांकावर आहेत. यापूर्वी, अदानीला 24 तासांत 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते आणि नंतर ते चौथ्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर घसरले. Mukesh Ambani has now surpassed Gautam Adani with a net worth of $84.3 billion

हे वाचलं का?

Adani Group : अदाणी ग्रुपच्या शेअर घसरणीत LIC ला फटका, 18 हजार कोटी…

टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत मागे राहिलेल्या अदानीही एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. 20.8 अब्ज डॉलर्सच्या एका दिवसाच्या घसरणीनंतर, ते एलोन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या पंक्तीत सामील झाले आहे. इलॉन मस्क यांनी एका दिवसात सर्वाधिक $35 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग $31 अब्ज आणि जेफ बेझोस $20.5 अब्ज गमावले.

जगातील इतर श्रीमंत लोकांबद्दल बोलायचे झाले तर, टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 214 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले बर्नार्ड अर्नॉल्ट हे जगातील पहिले तर एलोन मस्क हे 178.3 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जेफ बेझोस $126.3 अब्ज संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लॅरी एलिसन $111.9 बिलियनसह चौथ्या, वॉरेन बफे $108.5 बिलियनसह पाचव्या, बिल गेट्स $104.5 बिलियनसह सहाव्या स्थानावर आहेत.

Gautam Adani : अदानी समूहाचा डोलारा वाचविण्यासाठी धडपड; काय आहे प्लॅन?

कार्लोस स्लिम हेलू 91.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. यापैकी लॅरी पेज हे 85.8 अब्ज डॉलर्ससह जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचबरोबर मुकेश अंबानी पुन्हा एकदा टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत जोरदार पुनरागमन करत आहेत. 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. अदानी आता 83.9 अब्ज डॉलरसह दहाव्या क्रमांकावर आहेत.

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने 24 जानेवारी 2023 रोजी एक अहवाल प्रकाशित केला. यामध्ये अदानी समूहाबाबत 88 प्रश्न उपस्थित करण्यात आले असून कर्जाबाबतही दावे करण्यात आले आहेत. याचा परिणाम समूह कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. काही वेळातच अनेक कंपन्यांचे शेअर्स कोसळले. या अहवालाचा गुंतवणूकदारांवर परिणाम झाल्यामुळे अदानी कंपनीच्या बाँड्स आणि शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

    follow whatsapp