मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना उजेडात आली आहे. एका सात महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळून पाण्यात फेकण्यात आला. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
वनराई पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणावर घडली. सात महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. यासाठी श्वानाची मदत घेण्यात आली. बाळाच्या कपड्याच्या मदतीने श्वानाने मृतदेहापर्यंत मार्ग दाखवला.
श्वान मृतदेह फेकण्यात आलेल्या टाकीपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले. त्यानंतर हत्येचा घटनाक्रम करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली. कन्नन मुत्थूट गणेश स्वामी (कन्टू) असं आरोपीचं नाव आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याची प्रेयसी कुटुंबासह कायमची गावी जाणार होती. ती मुंबईतच थांबावी म्हणून ७ महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची कबूल त्याने दिली.
मुल कधी बेपत्ता झालं?
मृत बाळाच्या आईने दिलेल्या दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिला, तिची २० वर्षांची मुलगी आणि ७ महिन्याच्या मुलासह उड्डाणपुलाखाली झोपलेले होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ७ महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाला. कन्नन मुत्थूट गणेश स्वामी आरे कॉलनीत राहतो. रात्रीच त्याने मुलाचं अपहरण केलं.
आई, सात महिन्यांचा भाऊ आणि प्रेयसी कायमस्वरूपी गावी जाणार असल्याचं कळल्यानंतर आरोपीने प्रेयसीला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर थेट लहान भावाची हत्या केली.
ADVERTISEMENT