अमली पदार्थांचं कोल्हापूर कनेक्शन? चंदगड तालुक्यात एकाला अटक

मुंबई तक

• 12:06 PM • 17 Nov 2021

मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अमली पदार्थ सापडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी NCB च्या मुंबईतील पथकाने नांदेड येथे कारवाई करत गांज्याची ४९ पोती असलेला ट्रक जप्त केला. त्याआधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणही राज्यात चांगलंच गाजलं. आता राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट कोल्हापूरपर्यंत पोहचले आहेत. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथून ७२ तासांच्या चौकशीनंतर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अमली पदार्थ सापडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी NCB च्या मुंबईतील पथकाने नांदेड येथे कारवाई करत गांज्याची ४९ पोती असलेला ट्रक जप्त केला. त्याआधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणही राज्यात चांगलंच गाजलं. आता राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट कोल्हापूरपर्यंत पोहचले आहेत.

हे वाचलं का?

चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथून ७२ तासांच्या चौकशीनंतर एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ढोलगरवाडी येथील फार्महाऊसवर सलग ३ दिवस मुंबई पोलिसांचं एक पथक तपास करत होतं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमेवरच असलेल्या ढोलगरवाडीत अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सुरु असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे याच भागातून राज्यभसार देशभरात अमली पदार्थ विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पत्नीचा अश्लिल व्हिडीओ बनवून पतीकडून उकळले पैसे, आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईत एका महिला ड्रग पेडलरला अटक करण्यात आल्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदगड तालुक्यात छापा टाकण्यात आला. यावेळी सदर फार्महाऊसवर ड्रग्ज बनवले जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ६ संशयितांची कसून चौकशी केली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यावेळी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणात एका हायप्रोफाईल वकीलाचा सहभाग असल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवर सुरु आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात सध्या या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

    follow whatsapp