Sakinaka Rape Case “मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…” मनसे संतापली

मुंबई तक

• 02:37 AM • 12 Sep 2021

साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबईचा थरकाप उडाला. आरोपींने केलेल्या क्रूर अत्याचारांनी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीनं पीडितेच्या गुप्तांगात रॉडही घातला. या प्रकारामुळे दिल्लीत […]

Mumbaitak
follow google news

साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबईचा थरकाप उडाला. आरोपींने केलेल्या क्रूर अत्याचारांनी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीनं पीडितेच्या गुप्तांगात रॉडही घातला. या प्रकारामुळे दिल्लीत झालेल्या निर्भया घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तत्काळ शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण पाशवी अत्याचारांमुळे पीडितेचा उपचारादरम्यानं मृत्यू झाला. या घटनेनं मुंबई सुन्न झाली. तर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आणखी किती निर्भया? असं म्हणत मनसेनं नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे.

Sakinaka Rape case : “ताई, आम्हाला माफ कर… तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक नंबर”

‘आणखी किती निर्भया? मुंबईतील साकीनाका येथील पाशवी बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आता मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको. नराधमांना फासावर लटकवा’, अशी मागणी मनसेनं (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पोलिसांना पाच सूचना

1) महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात गस्त वाढवावी. महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो, शहरांतील अशी हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी.

Sakinaka Rape Case : विरोधकांनी सरकारवर चिखलफेक करू नये-संजय राऊत

2) प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.

3) स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.

4) महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.

5) गुन्ह्यांची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी.

Sakinaka Rape Case : “महाविकास आघाडी स्थापन होत असतानाच मी हे सांगितलं होतं”

सगळ्याच घटना भयानक -फडणवीस

‘साकीनाकात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणाऱा आहे. चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिनाभराच्या काळात बलात्काराच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. साकीनाक्याचा विषय असेल, अमरावतीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना असेल, पुण्यात तीन घटना घडल्या. त्यात सामूहिक बलात्काराच्याही घटना आहे. पालघरमध्ये घटना घडली आहे. या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत’, अशी चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp