विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला जामीन मंजूर, अखेर तुरुंगातून सुटका

मुंबई तक

• 11:44 AM • 17 Feb 2022

विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धारावीतल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामागे हिंदुस्थानी भाऊची चिथावणी होती असा आरोप झाला होता. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्याच्या बाजूने अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी कोर्टात […]

Mumbaitak
follow google news

विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊला आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धारावीतल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामागे हिंदुस्थानी भाऊची चिथावणी होती असा आरोप झाला होता. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्याच्या बाजूने अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी कोर्टात बाजू मांडली.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

आधीच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यावरूनच त्याला अटक करण्यात आली होती.

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?

हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास फाटक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे.’पहली फुरसतमे निकल’ हे वाक्य तुम्ही याआधी ऐकलंच असेल. य़ा वाक्याने आणि विकासच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मुंबईतच विकासचा जन्म झाला. त्याचा आवडता अभिनेता संजय दत्त आहे त्यामुळे विकासने त्याचा लुकही संजयसारखा केला आहे. युट्युबवर फेमस होण्याआधी विकासने प्रचंड मेहनत आणि कठीण काळ पाहिला आहे. त्यातून परिश्रम घेत आज तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विकासचे वडिलांची तो लहान असतानाच नोकरी गेली आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.

अशावेळी घरोघरी अगरबत्ती विकणे, वेटर ही कामे त्याने केली. याचकाळात त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि सातवीमध्येच त्याने शिक्षण सोडलं. त्यानंतर मुंबईच्या एका स्थानिक वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणूनही काम केलं.

फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यावर त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. विकासचा हा व्हिडीओ एका रात्रीत व्हायरल झाला. त्यानंतर विकासने देशाशी संबंधीत मुद्द्यांवर भाष्य करणारे व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. त्याच्या व्हिडीओला आणि स्टाइलला लोकांनी खूप पसंत केलं. विकासच्या व्हिडीमधील ‘रूको जरा सबर करो’ हा डायलॉग खूप फेमस झाला.

    follow whatsapp