मुंबईतल्या वांद्रे वरळी सी लिंकवर झालेला एक भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोघं जण हवेत उडाले आणि त्यानंतर खाली पडले. सी लिंकवर एक ४३ वर्षांचा एक माणूस त्याची कार बिघडल्याने थांबला होता. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. या दोघांना टॅक्सीने उडवलं. त्यानंतर हे दोघं हवेत उडाले आणि खाली पडले. यातला एकजण ठार झाला तर कार ड्रायव्हरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ड्रायव्हरचा जागीच मृत्यू, सातजण जखमी
नेमकी काय घडली घटना?
वांद्रे वरळी सी लिंकवर कारची धडक लागून एक घार जखमी झाली. त्या घारीला वाचवण्यासाठी ४३ वर्षांच्या एकाने कार थांबवली. त्यानंतर या कारमधून दोघे खाली उतरले. ते घारीला काय झालं ते बघत होते. तेवढ्यात दुस-या लेनमधून एक टॅक्सी आली. या टॅक्सीने या दोघांनाही उडवलं. हे दोघे हवेत उडाले. त्यानंतर एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला होता. त्या जखमी माणसाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जण ठार
अमर मनिष जरिवाला यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कारचे चालक श्याम सुंदर कामत हे जखमी झाले होते, त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. कामत यांच्यावर उपचार सुरू होते, त्यावेळी त्यांचाही मृत्यू झाला. अमर जरिवाला हे नेपियन सी रोडवरच्या एका सोसायटीत राहतात.
अमर जरिवाला यांना प्राणी पक्षी यांच्याविषय़ी विशेष संवेदना आहेत. सी लिंकवरून जात असताना एक घार त्यांच्या कारमुळे जखमी झाली. तिला काय झालं आहे हे पाहण्यासाठी अमर जरिवाला आणि त्यांचे कार चालक कामत हे दोघेही खाली उतरले होते. तेवढ्यात मागच्या लेनमधून वेगात आलेल्या टॅक्सीने या दोघांना धडक दिली. या धडकेत हे दोघेही उंच उडाले त्यानंतर खाली पडले. या घटनेत अमर जरिवाला यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे कार चालक कामत यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला.
ADVERTISEMENT