मुंबईचा राजा… गणेश गल्लीच्या बाप्पाचा फर्स्ट लूक!

मुंबई तक

• 09:02 AM • 09 Sep 2021

‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. शासन नियमानुसार गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा चार फूट उंच एवढीच बाप्पाची मूर्ती आणली आहे. लालबागच्या राजासह गणेश गल्लीचा बाप्पा पाहण्यासाठी देखील दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण यंदा भाविकांना ऑनलाइनच दर्शन घ्यावं लागणार आहे. दरवर्षी गणेश गल्लीचा गणपती […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.

शासन नियमानुसार गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा चार फूट उंच एवढीच बाप्पाची मूर्ती आणली आहे.

लालबागच्या राजासह गणेश गल्लीचा बाप्पा पाहण्यासाठी देखील दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण यंदा भाविकांना ऑनलाइनच दर्शन घ्यावं लागणार आहे.

दरवर्षी गणेश गल्लीचा गणपती हा 20 ते 22 फूट उंचीचा असतो. मात्र, यंदा शासन नियमानुसार 4 फुटांचीच मूर्ती मुख्य मंडपात विराजमान करण्यात आली आहे.

गणेश गल्लीचा गणपतीची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे देखावे. पण यंदा कोरोनाचा सावटामुळे हा सण साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

यंदा गणेश गल्ली मंडळाने फुलांच्या सजावटीने मुख्य मंडप सजवलं आहे. इथेच बाप्पाची मुख्य मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती मंडळाचं हे 94 वं वर्ष आहे.

    follow whatsapp