स्वयंपाक घरात वापरणाऱ्या सिलेंडरचा पाईप पत्नीच्या तोंडात टाकून तिची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. शहानवाझ सैफी असं या आरोपीचं नाव असून त्याला मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकातून पोलिसांनी अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर शहानवाझ आपल्या मुलीला घेऊन फरार झाला होता.
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या भागात जीवन बाग बुरहानी इमारतीत सैफी कुटुंब राहत होतं. शहानवाझ आणि त्याची पत्नी सदफ यांचा प्रेमविवाह होता. परंतू गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं होत होती. १ सप्टेंबरला दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर शहानवाझने सदफला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. यानंतर शहानवाझने पत्नीला चटके देऊन सिलेंडरचा पाईप तिच्या तोंडात टाकून हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर शहानवाझ आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन फरार झाला. मुंब्रा पोलिसांनी या घटनेचा तपास करायला सुरुवात केली. शहानवाझचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकात असल्याचं दाखवत होता. यानंतर मुंब्रा पोलिसांनी इटारसी रेल्वे पोलिसांना सूचना देऊन शहानवाझला अटक केली.
ADVERTISEMENT