– योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा सत्र सुरूच असून, नागपूरमध्ये सामूहिक बलात्काराची एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणीवर फेसबुकवर ओळख झालेल्या एका तरुणासह त्याच्या मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नराधमांनी दोन दिवस शहरातील विविध भागात नेऊन तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी ही घटना घडली असून, त्रास सुरू झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला.
अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी केली अटक
नागपूरमधील एका भागात राहणाऱ्या तरुणीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी हा तरुण पीडित तरुणीला कॅम्पस चौकातून दुचाकीवरून घेऊन गेला. त्या तरुणीला शहरातील विविध भागात नेलं.
आरोपी तरुणाने ज्या ज्या ठिकाणी तरुणीला नेलं. तिथे अगोदरच त्याचे तीन मित्र हजर होते. वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केले. दोन दिवस सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला शहरातील सीताबर्डी भागात सोडून दिलं.
Crime: मांत्रिकाने महिलेला सांगितलं, तुझा नवरा माझ्या अंगात येतो आणि मग…
या घटनेनंतर तरुणी घरी परतली. त्यानंतर तिच्या पोटात दुखू लागलं. तरुणीला त्रास होत असल्यानं तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तिच्या अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ही सर्व घडना प्रकाशात झाली.
सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं कळल्यानंतर पीडितेच्या कुटुबियांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत चारही नराधमांना बेड्या ठोकल्या.
क्रौर्याची परिसीमा! सिगारेटने जाळला चेहरा, डोळे काढले; बालकावरील अत्याचाराने पोलिसही हादरले
पीडितेवर शहरातील विविध भागात नेऊन दोन दिवस सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी दारूची पार्टी केल्याचंही पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागपुरातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT