ट्रेनच्या एसी डब्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी सव्वा चार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हा आरोपी एसी डब्यातून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
अटक करण्यात आलेला आरोपी रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून प्रवास करत होता. या आरोपीबद्दल नागपूर रेल्वे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. ज्यानंतर सापळा रचून ही गाडी नागपूर स्थानकात आली असता एसी डब्यातून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं.
वर्ध्यात नदीत पोहायला गेलेले चार तरूण बुडाले, दोघांचा मृत्यू
आरोपीकडून पोलिसांनी ४३ किलो गांजा जप्त केला असून बाजारात याची किंमत ४ लाख २५ हजारांच्या घरात आहे. नागपूर रेल्वे पोलीसांच्या वरिष्ठ निरीक्षक मनिषा काशिद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT