2000 Note Exchange Racket : शेंगदाने विकणारा चालवत होता 2000 ची नोट बदलण्याचं रॅकेट, नागपुरात रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसजवळ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. यानंतर या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेऊन या लोकांनी हा गैरप्रकार सुरू केला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Dec 2024 (अपडेटेड: 30 Dec 2024, 08:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

point

2000 रुपयांची नोट बदलून देणारं रॅकेट

point

रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग?

Nagpur : नागपुरात पोलिसांनी 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शहरातील संविधान चौक परिसरात असणाऱ्या चणे-फुटाणे विकणाऱ्याकडून हे रॅकेट चालवलं जात होतं. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे कार्यालय आणि महाराष्ट्र विधान भवनही याच परिसरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी नंदलाल मौर्य याच्यासह चौघांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

रॅकेट कसे चालत होते?

हे ही वाचा >> Fake IAS Officer : पोलिसांना सोबत घेतलं, हॉटेल-रिसॉर्ट मालकांना धमकावलं; तोतया IAS अधिकाऱ्याचे प्रताप वाचा

नंदलाल मौर्य याने काही लोक शोधून त्यांना कमिशनच्या बोलीवर कामावर ठेवलं होतं. हे लोक स्वत:चं आधार कार्ड वापरून  रिझर्व्ह बँकेत 2000 रुपयांच्या नोटा 500 रुपयांच्या नोटांमध्ये बदलत असत. यासाठी त्यांना 300 रुपये कमिशन देण्यात यायचं. आरोपीने स्वत:ने यापूर्वी 2000 च्या 10 नोटा बदलून घेतल्या होत्या, त्यानंतर ही प्रक्रिया समजून घेतल्यानंतर त्यांनं हे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी आरोपी मौर्यसह आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये रोहित बावणे (34), किशोर बहोरिया (30) आणि अनिल जैन (56) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असलेला जैन हा या रॅकेटचा सूत्रधार असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी मौर्य यांना 10 च्या नोटा बदलण्यासाठी 200 रुपये कमिशन देण्याचं ठरवलं होतं. शनिवारी पोलिसांनी छापा टाकून 60,000 रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये 500 रुपयांच्या 120 नोटांचाही समावेश होता. रोहित बावणे याच्याकडून 62,500 रुपये आणि किशोर बहोरियाकडून 80,000 रुपये जप्त करण्यात आले.

तपासात काय उघड झालं?

हे ही वाचा >> Beed Weapon License : बीडमध्ये शेकडोने बंदुका, परवाना कसा मिळतो? शासन कुणाला देतं शस्त्र बाळगण्याची परवानगी? वाचा सविस्तर

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अनिल जैन याच्या मार्गदर्शनाखाली हे रॅकेट सुरू असून, त्याच्याकडे 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे. जैन वेगवेगळ्या ग्राहकांकडून या नोटा गोळा करायचा आणि मौर्यच्या मदतीने त्या 500 रुपयांच्या नोटांमध्ये बदलून आणायचe. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली होती. यानंतर या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेऊन या लोकांनी हा गैरप्रकार सुरू केला होता.

दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा हात आहे आणि आतापर्यंत किती पैशांची देवाणघेवाण झाली आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरबीआयच्या धोरणाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही कारवाई एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

    follow whatsapp