नागपूर : सासरच्या मंडळींचा लग्न पुढे ढकलण्यास नकार, रुग्णसेवेसाठी डॉक्टरने लग्न मोडलं

मुंबई तक

• 11:56 AM • 07 May 2021

एकीकडे संपूर्ण राज्य कोरोनाच्या लाटेचा सामना करत असताना नागपूरमधल्या एका तरुण डॉक्टरने रुग्णसेवेला प्राधान्य देता यावं यासाठी आपलं लग्न मोडलं आहे. डॉ. अपूर्वा मंगलगिरी असं या तरुण डॉक्टरचं नाव असून २६ एप्रिल २०२१ रोजी अपूर्वाचं एका डॉक्टर युवकासोबत लग्न ठरलं होतं. परंतू एकीकडे नागपूर शहरात कोरोनामुळे तयार झालेली परिस्थिती पाहता अपूर्वाने लग्न पुढे ढकलण्याचा विचार […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे संपूर्ण राज्य कोरोनाच्या लाटेचा सामना करत असताना नागपूरमधल्या एका तरुण डॉक्टरने रुग्णसेवेला प्राधान्य देता यावं यासाठी आपलं लग्न मोडलं आहे. डॉ. अपूर्वा मंगलगिरी असं या तरुण डॉक्टरचं नाव असून २६ एप्रिल २०२१ रोजी अपूर्वाचं एका डॉक्टर युवकासोबत लग्न ठरलं होतं. परंतू एकीकडे नागपूर शहरात कोरोनामुळे तयार झालेली परिस्थिती पाहता अपूर्वाने लग्न पुढे ढकलण्याचा विचार बोलून दाखवला. परंतू तिच्या सासरच्या मंडळींनी याला नकार दिला. अशा परिस्थितही अपूर्वाने आपली डॉक्टर म्हणून जबाबदारी ओळखत रुग्णसेवेला प्राधान्य देत आपलं लग्न मोडलं आहे.

हे वाचलं का?

नागपूरच्या सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये गेल्या एक वर्षापासून अपूर्वा कन्सल्टंट फिजीशीअन म्हणून रुग्णसेवा करते आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अपूर्वाच्या वडीलांचं निधन झालं. या काळातही अपूर्वाने रुग्णसेवेला प्राधान्य दिलं होतं. अपूर्वाचं ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं तो देखील डॉक्टरच होता. २६ एप्रिलला अपूर्वाचं लग्न ठरलं होतं. तिच्या सासरच्या मंडळींना लग्न लवकरात लवकर उरकायचं होतं. परंतू बाहेर रुग्णांना आपली गरज असताना लग्न करण्याचा निर्णय अपूर्वाला पटला नाही. परंतू सासरच्या मंडळींकडून म्हणाला तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने आपलं ठरलेलं लग्न मोडलं.

नागपूर : लॉकडाउन काळात फिरतं लंगर भागवतंय गरिबांची भूक

मुंबई तक ने अपूर्वाशी यासंदर्भात संवाद साधला. “लग्नाच्या दहा दिवस आधी मी कुटुंबाशी चर्चा करुन त्यांना माझा निर्णय पटवून दिला. रुग्णसेवा करणं आता गरजेचं आहे आणि यासाठीच मी लग्न मोडत असल्याचं त्यांना सांगितलं. माझ्या घरच्यांनीही मला पाठींबा दिला आणि माझ्या निर्णयाचं स्वागत केलं.” कोरोनाकाळात रुग्णांना आपली गरज असताना अपूर्वाने धाडस दाखवून घेतलेल्या निर्णयाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

    follow whatsapp