पत्नीसह सासरच्या मंडळींकडून होणारा मानसिक छळ आणि सततच्या मारहाणीला कंटाळून नांदेडमध्ये एका प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. १५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी मयत प्राध्यापकाची पत्नी, सासू-सासरे यांच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्राध्यापकाने पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाबद्दल सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
मूळ नांदेड शहरातील राजेशनगर येथील रहिवासी असलेले प्राध्यापकाने उमरखेड येथील घरात आत्महत्या केली. संदिपान खंदारे असं मयत प्राध्यापकाचं नाव असून, स्नेहल गायकवाड असं पत्नीचं नाव आहे.
Crime: बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा नाल्यात सापडला मृतदेह, तब्बल 2 वर्षाने उलगडलं हत्येचं गूढ!
संदिपान आणि स्नेहल यांच्या लग्न झाल्यानंतर महिनाभरातच वाद सुरू झाले होते. त्यानंतर त्यांचा पत्नी स्नेहल गायकवाडकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.
नांदेडमधील रहिवाशी असलेले संदिपान रामकिसन खंदारे उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शिवाजी शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. संदिपान यांचा २०१९ मध्ये उमरखेड येथील स्नेहल गायकवाड यांच्याशी विवाह झाला होता.
डोंबिवली : पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं
लग्न झाल्यानंतर महिनाभरातच दोघांमध्ये वाद सुरू झाला. स्नेहल गायकवाड यांना संदिपान खंदारे यांच्या आईवडिलांसोबत राहायचं नव्हतं. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. यावरून संदिपानला पत्नीकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर संदिपान खंदारे हे उमरखेड येथे राहण्यास गेले.
उमरेखेड येथे राहायला गेल्यानंतर स्नेहल गायकवाड यांच्याकडून संदिपान खंदारे यांचा मानसिक छळ करणं सुरूच होतं, असं मयताने सुसाईडमध्ये नोटमध्ये म्हटलं आहे. उमरखेड येथील घरी संदिपान यांना त्यांची पत्नी स्नेहल गायकवाड, प्रथमेश गायकवाड, नम्रता गायकवाड यांना यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. हे सगळं संदिपान यांनी त्यांच्या बहिणीलाही सांगितलं होतं.
‘माझ्यावर बलात्कार केला, न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही द्यायाचा’, 10 वीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या
दरम्यान, मानसिक छळ आणि होत असलेल्या मारहाणीला कंटाळून संदिपान खंदारे यांनी १५ फेब्रुवारी रोजी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी होत असलेल्या त्रासाबद्दल रजिस्टरमध्ये लिहून ठेवल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी संदिपान खंदारे यांच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध भादंवि ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT