Nanded : मोबाईलचा हट्ट अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आपण पाहिल्या. पण नुकतीच नांदेडमध्ये मोबाईलच्या हट्टापायी घडलेल्या एका घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मिनकीमध्ये एका मुलानं आपल्या बापाकडे मोबाईलसाठी हट्ट केला. वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून, मुलगा रागात घराबाहेर निघून गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pune Crime: पुणेकरांसमोर त्याने घेतला तरुणीचा जीव, एकही आला नाही धावून!
नाराज झालेला मुलगा कुठंतरी रुसून बसला असावा म्हणून बापाने मुलाची शोधाशोध सुरू केली. शेतात आपल्या मुलाला शोधताना बापाने झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहिलं आणि बाप हादरला. पण हा घटनाक्रम इथेच थांबला नाही. मुलाचा मोबाईलचा हट्ट पूर्ण करता आला नाही, म्हणून खचलेल्या बापानं झाडाला लटकलेला मुलाचा मृतदेह स्वत: खाली उतरवला. हादरलेल्या बापानं त्याच दोरखंडाचा वापर करत, या बापाने स्वत: त्याच झाडाला फाशी घेतली. या संपूर्ण हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओमकार असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून, तो फक्त 16 वर्षांचा होता. तर राजेंद्र पैलवार हे त्याचे वडीलही आता या जगात राहिलेले नाहीत.
हे ही वाचा >> 'मी थोडा अस्वस्थ होतो कारण...' शरद पवारांचं मोठं विधान, पण...
दरम्यान, पैलवार कुटुंब हे आर्थिक अडचणीत होतं. नुकतेच त्यांचे दोन्ही मुलं सुट्टीत घरी आली होती. उदगीर शहरात मुलं शिकायला ठेवी असल्यानं पैलवार कुटुंबावर खर्चाचा ताण पडत होता असं समजतंय. तसंच या कुटुंबावर कर्ज असल्याचीही माहिती समोर आली आहे. घरी आलेल्या ओमकारने वडिलांना बुधवारी 8 जानेवारीरोजी आपल्या वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. तसंच त्याला शालेय साहित्य आणि कपड्यांसाठी पैसे मागितले होते. याच वेळी नाराज झालेल्या ओमकारने हे टोकाचं पाऊल उचललं आणि खचलेल्या बापानेही नंतर स्वत:ला संपवलं.
ADVERTISEMENT
