सुशांत सिंग राजपूतची घरात हत्या झाली आहे. त्यासंबंधीचे अनेक पुरावे मी दिले होते. पण कुणालाही अटक झाली नाही. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली पण ती आत्महत्या दाखवली. दिशा सालियनवर अत्याचार केले आणि तिला 18 व्या मजल्यावरून फेकून दिलं. तिनेही आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. मात्र ती पण हत्याच होती. या सगळ्यात मुख्यमंत्र्यांचा मुलगा अडकला होता त्यामुळे कुणालाही अटक झाली नाही असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
सुशांत सिंग राजपूतचा 14 जून 2020 ला मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी नारायण राणे यांनी सुशांतची सेक्रेटरी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांचीही हत्या झाली आहे असा दावा केला होता. तसंच या दोघांची हत्या झाल्यानंतरही आत्महत्या दाखवण्यात आली असंही म्हटलं होतं. आता आज नारायण राणेंनी पुन्हा एकदा या आरोपांचा पुनुरूच्चार केला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे सामील असल्याने कुणालाही अटक झाली नाही असाही आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणेंनी ऑगस्ट 2020 महिन्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसोबत पार्टीमध्ये आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली होता. दिशा सालियन एका पार्टीला गेली होती. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिला 18 व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आलं. या प्रकरणी जेव्हा सुशांतला माहिती मिळाली तेव्हा त्याने मी गप्प बसणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली आणि ती आत्महत्या आहे असं भासवण्यात आलं असा आरोप नारायण राणेंनी केला होता.
आता या प्रकरणी आज नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे सामील आहे त्यामुळे कुणालाही अटक झाली नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT