नाशिक : ‘वेळ लागेल म्हणाली अन् मोबाईल स्विच ऑफ झाला’; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूने शहर हादरलं

मुंबई तक

• 12:14 PM • 26 Jan 2022

नाशिक महापालिकेत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचे एका जळालेल्या कारमध्ये अवशेष आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. सुवर्णा वाजे-जाधव असं मयत वैद्यकीय अधिकारी महिलेचं नाव आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने दाखल केली होती. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांना एका जळालेल्या कारमध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. सुवर्णा वाजे या नाशिक मनपाच्या […]

Mumbaitak
follow google news

नाशिक महापालिकेत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचे एका जळालेल्या कारमध्ये अवशेष आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. सुवर्णा वाजे-जाधव असं मयत वैद्यकीय अधिकारी महिलेचं नाव आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने दाखल केली होती. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांना एका जळालेल्या कारमध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले.

हे वाचलं का?

सुवर्णा वाजे या नाशिक मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सकाळी कामावर गेलेल्या सुवर्णा वाजे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान जळालेल्या अवस्थेत एक कार पोलिसांना सापडली आणि त्या जळालेल्या कारमध्येच त्यांच्या जळून खाक झालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.

नाशिकमध्ये खळबळ! महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह

मंगळवारी (२५ जानेवारी) रात्री उशिरा विल्होळी गावाजवळ असलेल्या रायगड नगर परिसरात एक जळालेल्या अवस्थेतील कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारमध्ये महिलेचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी कारच्या चेसी नंबरवरून घटना उघडकीस आणली. घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने मानवी मृतदेहाचे अवशेष जमा केले असून, त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. ‘अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे,’ अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

कार सापडण्यापूर्वी काय घडलं?

सुवर्णा वाजे या मंगळवारी (२५ जानेवारी) ४ वाजता रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर रात्री ९ वाजून गेल्यानंतरही त्या घरी परत आल्या नाही. पत्नी (सुवर्णा वाजे) घरी न आल्यानं त्यांच्या पतीने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच मेसेजही केला. मेसेजला सुवर्णा वाजे यांच्या मोबाईलवरून रिप्लाय करण्यात आला.

धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरला, अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

‘मी कामात आहे. वेळ लागेल,’ असा रिप्लाय आला. त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला, अशी माहिती त्यांच्या पतीने दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायगडनगर परिसरात जळालेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. चारचाकी महामार्गालगत संरक्षण दलाच्या सराव क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याला सापडली आहे.

धक्कादायक ! सतत फोनवर बोलते म्हणून बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

ही घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp