शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये (Nashik) आणखी धक्का बसलाय. गेल्या महिन्यात काही माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेना (balasahebanchi shiv sena) पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आणखी 50 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची शिवसेना (Thackeray Faction) सोडलीये. यात शिवसेना (Shiv Sena), युवा सेना (Yuva Sena), शिव वाहतूक सेना (Shiv vahatuk Sena) आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यात राजकीय कुरघोड्या जिल्ह्यात दिसत आहे. आगामी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीही सुरू केलीये. अशात ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिलाय.
उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होण्यापूर्वीच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 50 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन तोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेची ढाल-तलवार हाती घेतलीये. या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज
यापूर्वीही गेल्या महिन्यात 12 माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये पक्षाला गळती लागल्यानं उद्धव ठाकरेंची सभा होणार होती, मात्र त्यापूर्वीच आणखी एक धक्का बसलाय.
नाशिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : कोणत्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात केला प्रवेश?
योगेश बेलदार (पूर्व विधानसभा प्रमुख),
अनिल साळुंखे (शहर संघटक),
बापू लहुजी ताकाटे (महाराष्ट्र राज्य उपसचिव महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना),
शिवा ताकाटे (शिवसेना समन्वयक नाशिक रोड),
अमोल सूर्यवंशी (उप महानगरप्रमुख),
योगेश चव्हाणके (उप महानगरप्रमुख),
प्रमोद लासुरे (उप शहरप्रमुख),
रुपेश पालकर (युवा सेना, महानगरप्रमुख),
संदेश लवटे (युवा सेना, नाशिक जिल्हा सरचिटणीस),
‘उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच, तेव्हा…’, योगींना सामनातून टोले अन् टोमणे
नाना काळे (विभागप्रमुख),
उमेश चव्हाण (विभागप्रमुख),
प्रमोद जाधव (विभागप्रमुख),
संदीप डहाके (विभागप्रमुख),
विनोद नुनसे (विभागप्रमुख),
शैलेश कार्ले (विभागप्रमुख),
प्रसन्ना तांबट (विभागप्रमुख),
प्रशांत आढाव (विभागप्रमुख),
महेश जोशी (सहाय्यक संपर्कप्रमुख पश्चिम विधानसभा, नाशिक महासचिव, विश्व ब्राह्मण महापरिषद आणि जिल्हाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष),
राहुल देशमुख (उप विभागप्रमुख),
प्रशांत गाडगीळ (उप विभागप्रमुख),
प्रशांत निचल (उप विभागप्रमुख),
स्वप्निल गायकवाड (उप विभागप्रमुख),
अजय निकम (उप विभागप्रमुख),
राजेश गीते (उप विभागप्रमुख),
महेश लोखंडे (उप विभागप्रमुख),
अमित कंटक (उप विभागप्रमुख),
प्रमोद काशेकर (उप विभागप्रमुख),
योगेश धामणस्कर (उप विभागप्रमुख),
गोकुळ मते (युवा सेना महानगर प्रमुख),
Yuvasena : प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना आदित्य ठाकरेंचा दणका
विशाल खैरनार (युवा सेना, उप महानगरप्रमुख आणि जिल्हा पोलीस बॉईज संघटना),
अंकुश बोचरे (युवा सेना, पूर्व विधानसभा प्रसिद्धी प्रमुख),
आकाश काळे (युवा सेना, शहर समन्वयक),
राकेश झोरे (युवा सेना, विस्तारक सोशल मीडिया),
मोहित पन्हाळे (युवा सेना, विभागप्रमुख),
अमित गांगुर्डे (युवा सेना विभागप्रमुख),
समीर कांबळे (युवा सेना, विभागप्रमुख),
गणेश परदेशी (शाखाप्रमुख),
राहुल रंधे (शाखाप्रमुख),
अमोल बराडे (शाखाप्रमुख),
अमोल वराडे (शाखाप्रमुख),
अनिल निरभवणे (शाखाप्रमुख),
प्रशांत निवळ (शाखाप्रमुख),
तकदीर कडबे (शाखाप्रमुख),
विशाल आहेर (शाखाप्रमुख),
आनंद गटकळ (शाखाप्रमुख),
उमेश सोनार (शाखाप्रमुख, नाशिक रोड वाहतूक सेना अध्यक्ष),
धीर कडाळे (शाखाप्रमुख),
अमेय जाधव (युवा सेना, उप महानगरप्रमुख),
लक्ष्मण पाटील (वाहतूक सेना, महाराष्ट्र सचिव),
मनोज उदावंत (शहर अध्यक्ष, महाराष्ट्र शिव वाहतूक सेना),
अनिल नागरे (जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र शिव वाहतूक सेना),
संदीप कदम (नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, शिव वाहतूक सेना),
रवींद्र पेहेरकर (प्रसिद्धी प्रमुख, शिव वाहतूक सेना),
पंकज भालेराव (सिन्नर तालुका अध्यक्ष शिव वाहतूक सेना),
अनिल शिंदे (सिन्नर तालुका उपाध्यक्ष, शिव वाहतूक सेना),
योगेश सावकार (जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण, शिव वाहतूक सेना),
अभिजित तागड (जिल्हाध्यक्ष ग्रामीण, शिव वाहतूक सेना).
ADVERTISEMENT