Navi Mumbai विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार- राज ठाकरे

मुंबई तक

• 07:28 AM • 21 Jun 2021

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार त्यात वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असं म्हणते आहे. तर इतर पक्षांची मागणी दी. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत आहेत. त्यावरून प्रशांत ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांनी […]

Mumbaitak
follow google news

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार त्यात वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असं म्हणते आहे. तर इतर पक्षांची मागणी दी. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करत आहेत. त्यावरून प्रशांत ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. शिवरायाचं नाव आल्यानंतर संघर्ष व्हायचीच गरज नाही. मला यामध्ये विषय काही दिसत नाही. आज बाळासाहेब ठाकरे असते तरीही त्यांनी शिवरायांचं नाव द्या हीच मागणी केली. प्रशांत ठाकूर यांना मी जेव्हा हा विषय सांगितला तेव्हा ते म्हणाले की विषयच संपला.

हे वाचलं का?

छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमातळचं एक्स्टेंशन आहे ते स्वतंत्र विमानतळ नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे त्या विमानतळाला वेगळं नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने… नेमकं प्रकरण काय?

सुमारे 900 हेक्टर जमीन संपादित करून तब्बल सोळा हजार रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai indternational Airport) प्रस्तावित निर्मिती सिडको (Cidco) व शासनामार्फत होत आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यास विरोध करत ठाणे बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन पुकारून या नावाला तीव्र विरोध केला. दरम्यान, यामुळे नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे अध्यक्ष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामांतराबद्दल त्यांची चर्चा झाली. ज्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विमानतळ स्वतंत्र नाही तर मुंबई विमानतळाचाच एक भाग आहे असं सांगितलं. तसंच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असणार आहे. ठाकूर यांना जेव्हा हा विषय मी सांगितला तेव्हा ते म्हणाले की आमच्याकडून कोणताही वाद आता असणार नाही. असंही राज यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp