ADVERTISEMENT
नवी मुंबईत मंगळवारी (28 फेब्रुवारी) सकाळी लोकलचा मोठा अपघात थोडक्यात टळला.
बेलापूरहून खारकोपरकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनचे 3 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले.
बेलापूरहून जात असताना हा अपघात झाला. अपघातामुळे प्रवासी घाबरून गेले.
यावेळी तात्काळ रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचली. सध्या लोकलची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
वेळीच गाडी थांबवल्याने मोठा अपघात टळला. कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा झालेली नाहीये.
अपघातामुळे नेरुळ-खारकोपर मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
ADVERTISEMENT