Navneet Rana Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात काय घडलं?

मुंबई तक

• 08:09 AM • 24 Apr 2022

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खार पोलीस आज सकाळी ११ वाजता राणा दाम्पत्याला वांद्रे येथील न्यायालयात घेऊन आले होते. त्यानंतर दुपारी सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने नवनीत राणा, रवि राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (Navneet & Ravi Rana remanded to judicial custody for 14 days) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खार पोलीस आज सकाळी ११ वाजता राणा दाम्पत्याला वांद्रे येथील न्यायालयात घेऊन आले होते. त्यानंतर दुपारी सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने नवनीत राणा, रवि राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (Navneet & Ravi Rana remanded to judicial custody for 14 days)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यानुसार ते मुंबईतही आले होते. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, नवनीत राणा आणि रवि राणा आपल्या भूमिकेवर ठाम होते.

शनिवारी बराच गदारोळ झाला. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, सायंकाळी खार पोलिसांनी १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना सकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

सकाळपासून आतापर्यंत काय घडलं, पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा…

    follow whatsapp