देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते, त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले-नवाब मलिक

मुंबई तक

• 09:34 AM • 09 Nov 2021

देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते अशी त्यांनी गर्जना केली होती. मात्र आज त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही बॉम्बस्फोटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून कवडी मोल दराने जमीन खरेदी केलेली नाही. आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यांना त्यांच्या गुप्तहेरांनी चुकीची माहिती दिली आहे. हसीना […]

Mumbaitak
follow google news

देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते अशी त्यांनी गर्जना केली होती. मात्र आज त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही बॉम्बस्फोटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून कवडी मोल दराने जमीन खरेदी केलेली नाही. आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले त्यांना त्यांच्या गुप्तहेरांनी चुकीची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

हसीना पारकरला मी ओळखत नाही. सलीम पटेलचा जो उल्लेख केला आहे, तो फरार आहे. आम्ही कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही. गोपीनाथ मुंडेही असेच आरोप करत होते. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचे फटाके भिजलेले होते असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी फटाके वाजवले पण त्यांचा आवाजच आला नाही.

आणखी काय म्हणाले मलिक?

आम्ही दीड लाख फूट जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी आरोप केला. खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला. त्या दीड लाख फूट जमिनीची पाहणी करा. त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हाऊसिंग सोसायटी आहे.1984 मध्ये तिथ इमारत बांधण्यात आली. ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन 140 लोकांना घरं दिली. त्याच्या मागे जमीन आहे त्यावर झोपडी आहे. तिथं जमीन आहे तिथं सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे.

गेल्या 30 वर्षांपासून ती जमीन आमच्याकडे आहे. 1996 मध्ये भाजप आणि शिवसेना पार्टीची सत्ता होती. 9 नोव्हेंबरमध्ये नवाब मलिक यांनी शिवसेना भाजपकडून पोटनिवडणूक विजयी झाले होते. त्याच गोवावाली बील्डिंगच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. आम्ही भाडेकरु होते. मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या असं म्हटलं. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली. सलीम पटेल याला मुनिरा पटेल यांनी पॉवर ऑफ अ‌ॅटर्नी केल होतं. सरकारी दरानुसार आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती. सरकारी कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

सरदार वली खानचं घर अजून त्याच जागेवर

देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. सरदार वली खानचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांना माहिती देणाऱ्यांनी माहिती दिली नाही की सरदार वली खानचं घर आहे. सरदार वली खानचे वडील गोवावाला कम्पाऊंडमध्ये वॉचमनचं काम करतात.ज्यावेळी मुनिरा पटेल यांच्याकडून जमीन घेतली तेव्हा सरदार वली खाननं 300 मीटरवर नाव चढवलं होतं. ते पैसे देऊन सरेंडर करण्याचं काम केलं. तिथं आमची दुकानं आहेत. गोवावाला बील्डिंगमधील संपत्ती त्यावेळी आमची होती. बिअर बार देखील तिथं होता, मुस्लीम समाजाच्या दबावामुळं आम्ही बिअर बार सरेडंर केला, असं नवाब मलिक म्हणाले.

    follow whatsapp