नवाब मलिकांची २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

विद्या

• 08:46 AM • 07 Mar 2022

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिकांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावनणी न्यायालयाने मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांना आज न्यायालयासमोर हजर केलं असताना ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, ज्याला नवाब मलिकांनीही आक्षेप घेतला नाही. ईडीच्या कारवाईला […]

Mumbaitak
follow google news

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिकांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावनणी न्यायालयाने मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

नवाब मलिकांना आज न्यायालयासमोर हजर केलं असताना ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, ज्याला नवाब मलिकांनीही आक्षेप घेतला नाही. ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका नवाब मलिकांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार असल्यामुळे मलिक यांचे वकील तारीक सय्यद यांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला. याचसोबत मलिकांच्या वकीलांनी त्यांना घरातलं जेवणं मिळावं यासाठी कोर्टासमोर आणखी एक अर्ज केला.

दोन्ही बाजूंचे पक्ष ऐकल्यानंतर कोर्टाने मलिकांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मध्यंतरी नवाब मलिकांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोर्टाने आज मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना घरचं जेवण मिळण्याबाबत ईडी आता आपलं म्हणणं मांडू शकत नाही असा युक्तीवाद मलिकांच्या वकीलांनी केला. ही बाब आता आरोपी, जेल अधिकारी आणि कोर्ट सहमतीने ठरवेल असं मलिक यांचे वकील सय्यद म्हणाले.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी नवाब मलिक यांना लिक्वीड डाएटवर रहायला सांगितलं आहे. ईडीची बाजू मांडणारे वकील सुनील गोन्झालविस यांनी हॉस्पिटलची फाईल आणि कागदपत्र पाहण्यासाठी वेळ मागितला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसीना पारकरसोबत मलिक यांच्या कंपनीने मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यवहार केल्याचा आरोप भाजपने केला होता. यावरुन ईडीने ही कारवाई करत मलिकांना अटक केली होती.

    follow whatsapp