राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नीरज गुंडे हा मागील सरकारमधला दलाल आहे. आज हा दलाल माझ्यावर आरोप करतो आहे. ज्याच्या चेंबूरमधल्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे आणि ज्या माणसाला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं.
आणखी काय म्हणाले नवाब मलिक?
नीरज गुंडे हा मोठा चोर आहे. तो कुणाचे पैसे कुठे लपवतो हे मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होतो, म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंचं सांगणं आहे की, किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट त्या कंपनीमध्ये मोहिज कंबोज याचा मनूभाई आगीचा नावाचा एक नातेवाईक होता. साडे तेरा कोटी रुपये ते त्याने घेतले आहेत. मोहित कंबोज चोर आहे, त्याचा नातेवाईक देखील चोर आहे. आणि खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवाब मलिक यांनी काल जो एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता त्याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या मेहुण्याचा मी काल फोटो ट्विट केला आहे. सध्या तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्याचा फोटो ट्विट करण्याचं कारण असं होतं की काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची वानखेडे यांनी भेट घेतली. मी माझ्या मतावर ठाम आहे की समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण मुस्लिम होते. बोगस दाखल्यावर ही नोकरी घेण्यात आली. 2015 पासून वानखेडे यांनी त्यांची ओळख लपवली असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आता या सगळ्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT