शरद पवारांनी घेतली माजी आमदार गणपतराव देशमुखांच्या कुटुंबाची भेट

मुंबई तक

• 08:40 AM • 08 Aug 2021

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातून ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुखांचं ३० जुलैला वृद्धापकाळाने निधन झालं. सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांना मानाचं स्थान होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. गणपतराव […]

Mumbaitak
follow google news

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातून ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुखांचं ३० जुलैला वृद्धापकाळाने निधन झालं. सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांना मानाचं स्थान होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सांगोल्यात गणपतराव देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

हे वाचलं का?

गणपतराव आणि मी एकत्र राजकीय क्षेत्रात काम केलं आहे. माझ्या घरातही शेतकरी कामगार पक्ष होता. त्यावेळी सतत कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. त्यावेळी गणपतराव आमच्या घरी यायचे. माझे बंधू अप्पासाहेब आणि गणपतराव यांचे चांगले संबंध होते. दुष्काळी भागात काम केल्यामुळे त्यांना नेहमी लोकांबद्दलची चिंता असायची. त्यांच्यासारखा स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न नेता महाराष्ट्रात होता हे आपलं भाग्य म्हणावं लागेल, अशा शब्दांत शरद पवारांनी गणपतरावांना आदरांजली वाहिली.

१९६२ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी माझ्या मंत्रीमंडळातही काम केलं. ते मला नेहमी म्हणायचे की मला मंत्री करु नका. सरकार कसं चालवायचं याचा परिपाठ त्यांनी घालून दिला होता. ग्रामीण भागातील लोकांसाठी काम करण्याकडे त्यांचा कायम ओढा असायचा. त्यांचं जाणं म्हणजे सांगोल्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि दुष्काळी भागाील लोकांसाठी हा मोठा धक्का असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

    follow whatsapp