ईडीने आता आपला मोर्चा शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर झालेली कारवाई. प्रफुल पटेल यांचं मुंबईतलं घर ईडीने जप्त केलं आहे. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबासोबत आर्थिक व्यवहार केला होता. जे काही झालं ते कायदेशीर झालं असं पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र आता ईडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं मुंबईतल्या वरळी भागात असेललं घर जप्त केलं आहे.
ADVERTISEMENT
इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची संदर्भातले हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.
ईडीच्या रडारवर आत्तापर्यंत शिवसेना होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आले आहेत. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबासोबत व्यवहार केले होते. जो करार केला होता त्या करारात इक्बाल मिर्चीने जागा दिली होती. त्यानंतर हा व्यवहार वादग्रस्त ठरला होता. मात्र हा व्यवहार कायदेशीर होता असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं प्रकरण काय?
वरळी येथे सीजे हाऊस (CJ House) नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचा बोट ठेवून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांना अटक
या प्रकरणाचा तपास सध्या ईडी करत आहे. ईडीने याप्रकरणी कारवाई करत इक्बाल मिर्चीच्या काही नातेवाईकांना अटक केली आहे. तसेच त्याच्या काही कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे. ईडीने इक्बाल मिर्ची याची मालमत्ता देखील जप्त केली आहे. प्रफु्ल्ल पटेल यांनी सीजे हाऊसमधील जी मालमत्ता इक्बाल मिर्चीला दिली होती ती मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे.
ADVERTISEMENT