मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. सध्या एकनाथ शिंदे गटातील 50 बंडखोर अस्वस्थ आहेत. जर आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर हे सरकार दुसऱ्याच दिवशी कोसळेल, असं एकनाथ खडसे यांनी भाकीत केलं आहे. आज पाचोरा येथे संवादयात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खडसे बोलत होते. या दरम्यान त्यांनी शिंदे गटावर जोरदार तोफ डागली. मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचं कारण देखील सांगितलं.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ विस्तार केला तर हे सरकार दुसऱ्याच दिवशी कोसळेल : खडसे
ज्यावेळी हे सरकार कोसळण्याची स्थिती येईल, त्याच्या 15 दिवस आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले जर आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर हे सरकार दुसऱ्याच दिवशी कोसळेल. कारण सरकारमधील आमदारांमध्ये आपापसात वाद आहे. आपसातील वादामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, जर मंत्रिमंडळ विस्तार केला तर भानगडी दहापट वाढतील. सरकारची स्थिती दोलायमान होईल, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. म्हणून एक-एक मंत्र्याकडे सहा-सहा खाती देण्यात आली आहेत.
ज्यांच्या घरात राहिलात त्याच उद्धव ठाकरेंना अक्कल शिकवायला लागलात : एकनाथ खडसे
शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता हे उद्धव ठाकरेंना अक्कल शिकवायला निघालेत. जे उद्धव ठाकरेंच्या घराण्यात वर्षानुवर्ष राहिले, तेच आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत, त्यांना अक्कल शिकवायला लागले आहेत, असं खडसे म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी तर जाहीर भाषण केली, गद्दारी माझ्या रक्तात नाही, पण पुढे काय केलं. पक्ष मीपण बदलला पण मी कुठल्या पदावर राहिलो नाही. ज्या उद्धव ठाकरेंमुळे तुम्ही निवडून आले त्यांच्याशी असं करणं योग्य नाही, असं खडसे म्हणाले.
आमची काळजी करू नका : गिरीश महाजन
चाळीसगाव येथे एकलव्य संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशनाच आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खडसेंच्या वक्तव्यावर पत्रकांशी बोलतांना म्हणाले, खडसेंनी स्वतःची काळजी करावी, आमची काळजी करू नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकार सांभाळायला, विस्तार करायला सक्षम आहेत. आपण त्याची अजिबात काळजी करू नका, आपण स्वतःची काळजी करावी, असं गिरीश महाजन म्हणालेत.
ADVERTISEMENT