देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांबाबत केलेलं वक्तव्य दिशाभूल करणारं-नवाब मलिक

मुंबई तक

• 08:49 AM • 23 Mar 2021

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले आहेत. तसंच शरद पवारांवरही आरोप केले आहेत मात्र त्या आरोपांना काही अर्थ नाही असं म्हणत नवाब मलिक यांनी हे सगळे आरोप खोडून काढले आहेच. तसंच पोलीस बदल्यांमध्ये जो देवाण-घेवाणीचा आरोप केला आहे त्यातही काही तथ्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले आहेत. तसंच शरद पवारांवरही आरोप केले आहेत मात्र त्या आरोपांना काही अर्थ नाही असं म्हणत नवाब मलिक यांनी हे सगळे आरोप खोडून काढले आहेच. तसंच पोलीस बदल्यांमध्ये जो देवाण-घेवाणीचा आरोप केला आहे त्यातही काही तथ्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. काही देवाण-घेवाण घेऊन ज्या बदल्या झाल्याचा आरोप होतो आहे त्यासंदर्भातला एक अहवालही नवाब मलिक यांनी वाचून दाखवला.

हे वाचलं का?

महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?-फडणवीस

नवाब मलिक काय म्हणाले?

जी नावं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत ती चुकीची आहेत. जनतेची ते दिशाभूल करत आहेत. रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल सादर केला होता त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की संदीप बिष्णोई यांच्या बदलीसाठी देवाण-घेवाण झाली होती तशी कोणतीही बदली झाली नाही. ना गृहखात्याने त्या संदर्भातली शिफारस केली होती. बिपुल कुमार सिंग अप्पर पोलीस महासंचालक यांची बदली करण्याचं डील झालं आहे ती पण बदली त्या पद्धतीने झालेली नाही.

जो अहवाल ते सांगत आहेत माहिती देत आहेत त्यामागे फक्त महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट आहे. रश्मी शुक्ला यांनी कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप केले. राज्यात सरकार स्थापनेच्या काळातही रश्मी शुक्ला या अनेक नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीस हे ज्या अहवालाचा दाखला देत आहेत त्यातील ८० टक्के बदल्या त्या पद्धतीने झालेल्याच नाहीत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp