कार्यकर्त्यांसाठी ‘आमदार’ झोपले जमिनीवर

मुंबई तक

• 03:15 PM • 17 Feb 2021

आमदार नीलेश लंकेचा आमदार निवासातला एक फोटो सोशल मीडिय़ावर व्हायरल झाला आहे. सदर फोटोत आमदार लंके हे जमिनीवर झोपलेले दिसत असून लंकेसोबत असलेले कार्यकर्ते हे पलंगावर झोपले असल्याचे दिसत आहे. आमदार लंके यांच्या एका कार्यकर्त्यानेच हा फोटो काढून फेसबुकवर टाकल्याने लंके यांच्या साधेपणाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. बुधवारी कॅबिनेटची बैठक असल्याने नीलेश लंके हे पहाटेच […]

Mumbaitak
follow google news

आमदार नीलेश लंकेचा आमदार निवासातला एक फोटो सोशल मीडिय़ावर व्हायरल झाला आहे. सदर फोटोत आमदार लंके हे जमिनीवर झोपलेले दिसत असून लंकेसोबत असलेले कार्यकर्ते हे पलंगावर झोपले असल्याचे दिसत आहे. आमदार लंके यांच्या एका कार्यकर्त्यानेच हा फोटो काढून फेसबुकवर टाकल्याने लंके यांच्या साधेपणाची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

हे वाचलं का?

बुधवारी कॅबिनेटची बैठक असल्याने नीलेश लंके हे पहाटेच आमदार निवासात पोचले तेव्हा तिथे काही कार्यकर्ते आधीपासूनच पलंगावर झोपले होते. तेव्हा या कार्यकर्त्यांना डिस्टर्ब न करता खोलीतला एक कोपरा पकडून आमदार लंके हे झोपले. सकाळी उठून त्यांच्याच एका कार्यकर्त्याने हा फोटो काढून सोशल मीडीयावर शेअर केला.

ही बातमी देखील वाचा : सरपंच नसलेलं गाव, पाहा काय आहे ‘या’ गावाची कहाणी

आमदार लंके हे त्यांच्या साधेपणासाठी त्यांच्या मतदरासंघात प्रसिध्द आहेत. सर्वसामान्यांमध्य़े मिसळणारे आमदार अशी त्यांची ओळख आहे.

आमदार लंके हे याआधीही चर्चेत होते. शरद पवारांबरोबरचा त्यांचा विमान प्रवास चर्चेचा विषय़ ठरला होता. तर पारनेर नगर परिषदेतल्या शिवसेनेच्या 6 नगरसेवकांचा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला होता तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आले होते. त्यानंतर आता स्वतःच्या साध्या राहणीमानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

    follow whatsapp