जका खान (वाशिम)
ADVERTISEMENT
वाशिम: राज्यातील सरकार पडल्यानंतर आता विरोधी पक्ष पुढच्या वाटचालीसाठी कामाला लागले आहेत. पक्षाचा प्रचार, मेळावे, सभा घेत आहेत. असंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वाशिममधील कारंजा शहरात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबई तकशी संवाद साधला यावर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंच्या गावातील विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही ना पूल परंतु दोन हेलिपॅड आहेत अशी टिपण्णी काल कोर्टाने केली होती, त्यावर जयंत पाटील म्हणाले ”एकनाथ शिंदेंना सारखं गावाला जाण्याची सवय आहे, त्यामुळे गावात 2 हेलिपॅड आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde)?
शिवसेना कोणाची, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, ती एकनाथ शिंदेंची कधीच असू शकत नाही, कारण बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे जयंत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, मनसेच्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी?
बंडखोर परत निवडणूक येणार नाहीत
पुढे ते म्हणाले नांदेड-हिंगोलीतील शिवसैनिक डळमळत नाही, तिथे स्थीर आहे. परंतु एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करत निघून गेलेले आमदार आगामी निवडणुकीत पराभूत होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतल्यावर जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीची उपमुख्यमंत्रिपदावर पदावनत झाली, काहीतरी गडबड आहे असे वाटते.
यावेळी बोलतान जयंत पाटलांनी राज्यापालांनर देखील टीकाक केली आहे. अडीच वर्षांच्या सत्तेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका कशी होती, या प्रश्नावर ते म्हणाले की, असे राज्यपाल आपण संपूर्ण भारतात पाहिले नाहीत, त्यांनी एवढे चांगले काम केले आहे, तसा दुसरा राज्यपाल नाही.
ADVERTISEMENT