शेखपूरा : मनुस्मृतीचे दहन करून सिगारेट ओढताना आणि चिकन शिजवताना एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रिया दास (Priya Das) असं या तरुणीचं नाव असून ती बिहारमधील (Bihar) शेखपुरा इथं राहणारी आहे. २७ वर्षीय प्रिया दास या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) महिला सेलमध्ये राज्य सचिव आहेत. (In the viral video, Priya Das is smoking cigarette by burning Manusmriti and cooking chicken on a stove.)
ADVERTISEMENT
‘आज तक’ने प्रिया दास या संपर्क करुन मनुस्मृती जाळण्यामागील उद्देश विचारला असता, त्यांनी सांगितलं की तिने मनुस्मृती सुमारे ५०० रुपयांना विकत घेतली होती. मनुस्मृतीत असं लिहिलं आहे की, जर एखाद्या महिलेने दारु प्यायली तर तिला अनेक प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. तसंच न्याय करण्याआधी संबंधितांची जात जाणून घेण्याबाबतही उल्लेख केला आहे.
मी नॉनव्हेज खात नाही, सिगारेट ओढत नाही :
मनुस्मृती जाळण्याचा आणि चिकन शिजवण्याचा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. मनुस्मृती जाळणं चुकीचं असल्याचं शेकडो लोकांनी म्हटलं आहे. मात्र, अनेक लोकांनी प्रियाच्या सिगारेट ओढण्यास आणि चिकन शिजवण्यालाही विरोध केला आहे. पण ‘आज तक’शी बोलताना प्रिया दास म्हणते, मी नॉनव्हेज खात नाही आणि सिगारेटही ओढत नाही. याचा अर्थ कदाचित, प्रिया दास व्हिडिओमध्ये प्रिया दास चिकन करणं आणि धूम्रपान करणं हे केवळ निषेध नोंदवण्यासाठी दिसत आहे.
राजकारणासोबतच प्रिया शिक्षण घेत आहे आणि शिक्षिका बनण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. प्रिया सीटीईटी उत्तीर्ण झाली आहे. पीएचडीसाठीही तिचे प्रयत्न सुरु असल्याचे तिने सांगितलं.
स्वतःला एक दलित कार्यकर्ता म्हणवणारी प्रिया दास दुसर्या व्हिडिओमध्ये म्हणते, मनुस्मृती जाळणे ही एक कृती आहे, बाबासाहेबांनी मनुस्मृती जळून फार पूर्वीच निषेध नोंदवला होता. मनुस्मृती जाळण्याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीप्रती नाही. दांभिकता आणि ढोंगीपणाच्या विचारांवर हल्ला करणे हाच माझा उद्देश होता.
प्रिया दास म्हणाल्या की ही फक्त सुरुवात आहे. असा ग्रंथ अस्तित्वात नसावा. हे पुस्तक कोणत्याही अर्थाने योग्य नाही. माणसाला कोणत्याही पुस्तकातून ज्ञान मिळते. पण, हे पुस्तक उच्च-नीच, भेदभाव आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करते. अशा परिस्थितीत अशा पुस्तकाला विरोध व्हायलाच हवा.
Maharashtra: नाना पटोले राहणार की जाणार? काँग्रेस मोठ्या निर्णयाच्या तयारीत
‘सर्व वाईट प्रथांचे मूळ मनुस्मृती आहे’ :
प्रिया दास म्हणाल्या की, या पुस्तकात मानव आणि महिलांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या कोणत्याच पद्धतीने योग्य नाहीत. या पुस्तकाचे प्रत्येक पान जाळायला पाहिजे. प्रिया म्हणाल्या की, दलित लोकांनी पुढे येऊन अशा पुस्तकाला विरोध केला पाहिजे. समाजात पसरलेल्या सर्व वाईट गोष्टींच्या मुळाशी मनुस्मृती असल्याचा दावाही प्रियाने यावेळी केला. मग ते स्त्रियांशी संबंधित असो किंवा विवाह प्रथांशी संबंधित असो. बाबासाहेबांनीही मनुस्मृतीचे दहन केल्याचे ती म्हणते.
प्रियाला विचारण्यात आले की, तुम्ही सिगारेट ओढता, ती पिणे हानिकारक आहे. यावर त्या म्हणाला- माझा उद्देश हा नाही की लोकांनी सिगारेट ओढावी. मी हे केले कारण मी एका महिलेबद्दल बोलत होते. मनुस्मृतीत महिलांसाठी त्या काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सिगारेट ओढून त्यांनी अशा सर्व गोष्टींचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांना विरोध करण्याचा हा एक प्रकार आहे. मनुस्मृती जाळल्यानंतर तुम्हाला भीती वाटत नाही का? यावर त्या म्हणाला की आता त्या पुढे आल्या आहेत. ज्याला जे करायचे ते तो करू शकतो. आता भीती वाटत नाही.
ADVERTISEMENT