प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टवर कुणी संतापलं तर कुणी उडवली खिल्ली! नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई तक

• 11:39 AM • 30 Sep 2022

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या फरसाण प्रेमामुळे प्रसिद्ध आहेच. शिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं अँकरींगही ती करते. मात्र प्राजक्ता माळी तिच्या फेसबुक पोस्टमुळेही चर्चेत असते. सध्या प्राजक्ता माळी लंडनमध्ये आहे. शुटिंगसाठी ती तिकडे गेली आहे. मात्र तिने एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फेसबुक पोस्टमध्ये अनेक […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या फरसाण प्रेमामुळे प्रसिद्ध आहेच. शिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं अँकरींगही ती करते. मात्र प्राजक्ता माळी तिच्या फेसबुक पोस्टमुळेही चर्चेत असते. सध्या प्राजक्ता माळी लंडनमध्ये आहे. शुटिंगसाठी ती तिकडे गेली आहे. मात्र तिने एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फेसबुक पोस्टमध्ये अनेक चुका आहेत असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टमध्ये काय आहे?

प्राजक्ता माळीने जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टमध्ये ती आपल्याला आपल्या देशाची आठवण येत असल्याचं म्हणते आहे. तसंच तिने सागरा प्राण तळमळला या ओळीही पोस्ट केल्या आहेत. कुणी यावरून संताप व्यक्त केला आहे तर कुणी तेम्स या नदीचं नाव प्राजक्ताने थेंब्स असं लिहिलं आहे त्यामुळे संताप व्यक्त केला आहे. तर कुणी प्राजक्ता माळीची खिल्लीही उडवली आहे.

काय आहे प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट?

ने मजसी ने परत मातृभीला….

सागरा प्राण तळमळला…

भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…

एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…

त्याला अनेक कारणं आहेत..,

१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.

२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.

३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.

४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.

५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.

६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)

काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती.

.

असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले.

फक्त २ दिवस बाकी.. आलेच…

.

थेंम्स नदीच्या काठावर…

प्राजक्ताच्या पोस्टमध्ये काय चुका आहे ज्यामुळे ती ट्रोल झाली?

अशी पोस्ट प्राजक्ता माळीने फेसबुकवर दोन दिवसांपूर्वी लिहिली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ने मजसी ने परत मातृभूमीला अशा ओळी आहेत. प्राजक्ताने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये मातृभी असा उल्लेख केला आहे. तसंच लंडनमधल्या तेम्स नदीचं नाव थेंब्स नदी असं लिहिलं आहे. ते नंतर बदलून थेम्स असं केलं आहे. ब्रिटिशांनी १५० वर्षे आपल्याला फसवून आपल्यावर राज्य केलं यावरही अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

“मन क्यूँ बहका रे बहका..” असं प्राजक्ता माळी का म्हणते आहे?

नेटकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

थेम्बसे जाती है ओ हौद से नाही आती, नदीचा नाद नाही करायचा अशी कमेंट एकाने केली आहे. अनेक थेंबांनी बनलेली या अर्थाने त्यांनी नदीला थेंबाचे अनेकवचन वापरून ‘थेंब्स’ म्हटले असावे. कल्पकतेला सलाम अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

योगेश दामले हा नेटकरी म्हणतो..

थेम्ब्स,

एडिनबर्ग,

वूरसेस्टरशायर,

लीसेस्टर,

सूसेक्स,

लॉच नेस,

प्लायमाउथ,

सॅनड्रिंग-बकिंग-हॅम,

कोकणी,

मार्लबोरोघ,

ग्रीनविच,

केंब्रिडज,

ग्लोऊसेस्टरशायर,

वॉरविकशायर,

सुर्री,

किर्कबाय.

प्राजक्ताताई, तुम्ही एक ठिणगी पेटवली, आता आम्ही वणवा पेटवू, इंग्रज पळवू!!

‘थेंब्स’ वाचल्यावर नदी आटली आणि ‘मातृभी’ वाचल्यावर प्राण तळमळला असं रणजीत पडळकर या नेटकऱ्याने लिहिलं आहे.

चेहऱ्यावरचे आनंदी भाव बघता… प्राण तळमळला असेल असं वाटत नाही असंही प्राजक्ता माळीला एका नेटकऱ्याने सुनावलं आहे.

आता गेलाच आहात तर ब्रिटिशांना चांगला खडसावून जाब विचारा, भारतावर राज्य करतात म्हणजे काय? हे चालणार नाही म्हणाव !

वा रे वा, ब्रिटिश कुठले असं रविंद्र पटोले या नेटकऱ्याने म्हटलं आहे आणि प्राजक्ताची खिल्ली उडवली आहे.

    follow whatsapp