कोल्हापूर : नवजात अर्भकाला पोत्यात गुंडाळून फेकलं, लहानग्या बाळाचा मृत्यू

मुंबई तक

• 06:00 AM • 29 Nov 2021

कोल्हापूरच्या शिंगणापूर भागात एका नवजात अर्भकाला पोत्यात गुंडाळून शेतवाडीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतवाडीत मुलं खेळायला आली असताना त्यांना पोत्यात मृत अर्भक नजरेस पडलं. यानंतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेश नगरजवळ हरिजन समाजाची पडसर सामाईक शेती आहे. इथं काही प्रमाणात झुडप उगवलेली आहेत, तर रिकाम्या […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूरच्या शिंगणापूर भागात एका नवजात अर्भकाला पोत्यात गुंडाळून शेतवाडीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतवाडीत मुलं खेळायला आली असताना त्यांना पोत्यात मृत अर्भक नजरेस पडलं. यानंतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हे वाचलं का?

करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या गणेश नगरजवळ हरिजन समाजाची पडसर सामाईक शेती आहे. इथं काही प्रमाणात झुडप उगवलेली आहेत, तर रिकाम्या क्षेत्रात मुलं खेळतात. या ठिकाणी छोटासा पाण्याचा नाला आहे. या परिसरातील मुलं आज तिथं खेळत होती. दरम्यान एक मुलगा या नाल्याशेजारी गेला असता, प्लास्टिक गोणपाटामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह त्याला दिसला. त्या मुलानं आरडाओरडा करत, परिसरातील नागरिकांना त्याची माहिती दिली.

त्यानंतर सरपंच प्रकाश रोटे, दत्तात्रय आवळे घटनास्थळी आले. हे अर्भक पुरुष जातीचं असून, त्याच्या पोटाचा आणि डोक्याचा काही भाग कुत्र्यानी ओरबाडल्यानं पाहणार्‍याच्या अंगावर काटा येत होता.करवीर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून, या अर्भकाच्या मृतदेहाचा पंचनामा करत, पुढील तपास सुरू केलाय. अनैतिक कृत्यातून हे नवजात अर्भक या परिसरात टाकून देण्यात आलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

    follow whatsapp