सचिन वाझे प्रकरणाची चौकशी करणाऱ्या NIA च्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली, थेट मिझोरामला

मुंबई तक

• 07:48 AM • 13 Apr 2021

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA मध्ये एक मोठी पण वेगळी घटना घडली आहे. NIA चे महानिरिक्षक (IG) अनिल शुक्ला यांची काल (13 एप्रिल) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती देखील थेट मिझोराम येथे. अनिल शुक्ला यांच्या जागी आता IPS अधिकारी ज्ञानेंद्र वर्मा यांची […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA मध्ये एक मोठी पण वेगळी घटना घडली आहे. NIA चे महानिरिक्षक (IG) अनिल शुक्ला यांची काल (13 एप्रिल) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती देखील थेट मिझोराम येथे.

हे वाचलं का?

अनिल शुक्ला यांच्या जागी आता IPS अधिकारी ज्ञानेंद्र वर्मा यांची एनआयएच्या महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे सचिन वाझे आणि त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरु असताना अचानक एनआयएमध्ये करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अनिल शुक्ला यांनी अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIA च्या तपास कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मोठी बातमी: एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला NIA कडून अटक, सचिन वाझेच्या ‘राईट हँड’ला ठोकल्या बेड्या

अनिल शुक्ला यांनी सचिन वाझेच्या अटकेपासून महाराष्ट्र पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांची चौकशी करेपर्यंत अनेक गोष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याच नेतृत्वात NIA ने या दोन्ही प्रकरणात बराच चांगला तपास केला होता.

अनिल शुक्ला हे जवळपास 6 वर्ष NIA मध्ये होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचं एनआयएमधील सूत्रांचे म्हणणं आहे. पण अचानक झालेल्या या बदलीने आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?

एपीआय रियाझ काझीला अटक

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील अधिकारी रियाझ काझी याला अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या सचिन वाझे याचा CIU मधील सर्वात विश्वासू अधिकारी म्हणून रियाझ काझी हा ओळखला जात होता. त्यामुळे NIA सखोल चौकशीअंती त्याला अटक केली होती.

रियाझ काझीच्या अटकेमुळे मुंबई पोलीस दलाला आणखी एक हादरा बसला आहे. कारण या संपूर्ण प्रकरणाने आधीच मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अशावेळी आता आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने मुंबई पोलिसांसाठी हा आणखी एक मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, रियाझच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर निलंबनाची देखील कारवाई केली आहे.

सचिन वाझे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उठले होते. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं होतं. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात व्यावसायिक हितसंबंध असल्याची बाबही समोर आली होती.

बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विविध आरोप करत सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे दाखवून दिले. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा मिळावी अशीही मागणी ५ मार्चला केली. पण त्याच दिवशी दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळव्याच्या खाडीत आढळून आला.

यानंतर आणखी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे आणखी काही कागदपत्रे, सीडीआर यांचा हवाला देऊन विधानसभेत सांगितलं. हे संपूर्ण प्रकरण NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणीही केली होती. अखेर घटना स्फोटकांसबंधी असल्याने NIA ने हे प्रकरण स्वत:कडेच घेतलं आणि तपासानंतर काही दिवसातच सचिन वाझेला अटक केलं. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयएकडेच आहे.

    follow whatsapp