महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आता राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. अमरावती, अकोला यासारख्या शहरांत ८ मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. यानंतर हिंगोलीमध्येही ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
संचारबंदीच्या काळात शहरवासियांसाठी नियम आखून देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानं आणि दूध विक्री केंद्र सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्ह्यातील मंदिर, शाळा, महाविद्यालयं, मंगल कार्लालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय. या काळात शासकीय, निमशासकीय, कार्यालयं, बँकांची कामकाज सुरु राहणार आहेत.
अवश्य वाचा – नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात माजी सैनिकांची टास्क फोर्स
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा बसलेल्या विदर्भातील अमरावती आणि अकोला या शहरांमधली परिस्थिती अजुनही नियंत्रणात येताना दिसत नाहीये. फेब्रुवारी महिन्यात शहरातील रुग्णसंख्यांमध्ये होणारी वाढ पाहता जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर आणि अचलपूर या भागात लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावतीमधला लॉकडाउन ८ मार्चपर्यंत वाढवला आहे. अमरावती आणि अचलपूरसोबत अंजनगाव सुर्जी हे गावही कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT